JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'माझ्या मनात कोणाबद्दलच..'; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबतच्या भेटीआधी संजय राऊतांची प्रतिक्रिया

'माझ्या मनात कोणाबद्दलच..'; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबतच्या भेटीआधी संजय राऊतांची प्रतिक्रिया

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज संजय राऊत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी राऊत यांनी प्रतिक्रियाही दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 नोव्हेंबर : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. बुधवारी तब्बल 103 दिवसांनी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यानंतर संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज संजय राऊत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी राऊत यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. संजय राऊत याबद्दल माहिती देताना म्हणाले, की मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शरदव पवारांची भेट घेणार आहे. तीन महिन्यांनंतर मी हातात घड्याळ घातलं आहे. लोकांनी तीन महिन्यांनंतरही भरपूरप्रेम दिलं. माझ्या मनात कोणाबद्दलही काहीच तक्रार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. शिवसेनेचा वाघ बाहेर आलाय आता…, राऊतांच्या जामिनावर खडसेंची प्रतिक्रिया संजय राऊत बुधवारी आर्थर रोड जेलच्या बाहेर आल्यानंतर शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पहिले सिद्धीविनायक मंदिरात गेले, यानंतर त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर संजय राऊत त्यांच्या घरी परतले. घरी येताच राऊतांचा निशाणा - संजय राऊत यांनी घरी येताच एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. 103 दिवस आतमध्ये होतो, आता 103 आमदार निवडून येतील, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, असं संजय राऊत म्हणाले. ‘अटकेने सुरूवात झाली, आता सुटलो आहे, आता सुसाट सुटायचं. मला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. आता रडायचं नाही तर लढायचं. महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या