JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज ठाकरेंच्या मदतीला संजय मोने आले धावून! सांगितला 'मोठी बातमी' मागचा अर्थ

राज ठाकरेंच्या मदतीला संजय मोने आले धावून! सांगितला 'मोठी बातमी' मागचा अर्थ

संजय मोने हे तडाखेबंद अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत, तसे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दलही! त्यांनी त्यांच्या या पोस्टच्या खाली तळटीप लिहून भूमिका स्पष्ट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जानेवारी: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडत असल्याच्या बातम्या आल्या. मनसेचे दोन नेते पक्ष सोडून गेले. एकाने शिवसेनेला जवळ केलं तर दुसरा भाजपच्या मार्गी लागला. मनसेसाठी हा एक मोठा धक्का मानण्यात येत आहे. त्याच वेळी या पक्षाच्या राजकारणाला आणि राज ठाकरे यांची बाजू उचलून धरणारी एक पोस्ट प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी Facebook वर केली आहे आणि ती काही क्षणांत व्हायरल झाली आहे. राज ठाकरे यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनमोकळेपणाने कौतुक करत मोने यांनी मनसेतून एखादा नेता दुसऱ्या पक्षात जातो त्याची मोठी बातमी का होते, हे समजावून सांगितलं आहे. “माझ्या मतदारसंघात जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे,श्री.नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले,त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे..”, असं मोने लिहितात. संजय मोने हे तडाखेबंद अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत, तसे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दलही! त्यांनी त्यांच्या या पोस्टच्या खाली तळटीप लिहून भूमिका स्पष्ट केली आहे. “मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाहीये. फक्त परिस्थिती आणि अवस्था काय होती ते सांगतोय”, असं त्यांनी लिहिलं आहे. डोंबिवलीतले मनसेचे माजी विरोधी पक्षनेते, गटनेते मंदार हळबे (Mandar Halbe in BJP)भाजपत प्रवेश करणार आहेत. दादर पक्ष कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात याआधी सोमवारी मनसेचे (MNS) डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मोने यांची पोस्ट विशेष गाजते आहे. काय लिहिलं आहे संजय मोने यांनी? ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे,त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुस-या पक्षात प्रवेश केला की लगेच “मोठी बातमी"असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते..याचा अर्थ त्या पक्षाच्या “असण्याची"सगळे जण दखल घेतात..हो ना?याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा..या मधल्या “lock down"च्या काळात सत्ता हाताशी नसतांना ज्यांनी तुम्हाला मदत (साहाय्य खरं तर)केली ,ते जरा लक्षात ठेवा..माझ्या मतदार संघात ,जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे,श्री.नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले,त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे..कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते..तर थोडा शब्दप्रयोग बदलतो,तर..आपला हक्क आहे असं समजा…

तळटीप-मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाहीये.फक्त परिस्थिती आणि अवस्था काय होती ते सांगतोय..इतर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आणि अवस्था होती..शेवटी आपण ठरवायचं आहे..जाणता राजा (जो जाणतो)आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी -इप्सित स्थळी सुरक्षित नेतो )यात निवड करायची आहे..बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका..रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या