JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पाणी द्या, नाहीतर कर्नाटकात जातो; महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांचा सरकारला इशारा

पाणी द्या, नाहीतर कर्नाटकात जातो; महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांचा सरकारला इशारा

यंदा जुलै महिना संपत आला तरी पाऊसाने हजेरी लावली नाही,त्यामुळे यावर्षी जत तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.

जाहिरात

पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जातो, ग्रामस्थांचा इशारा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 26 जुलै : सांगलीच्या जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटक मध्ये जाण्याचा इशारा दिला आहे,यासाठी थेट आंदोलन देखील सुरू केला आहे.काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 हुन अधिक गावांनी संख येथे चक्री उपोषण सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. यंदा जुलै महिना संपत आला तरी पाऊसाने हजेरी लावली नाही,त्यामुळे यावर्षी जत तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे,तर पाऊसा आभावि खरिपाच्या पेरण्या जवळपास 100% वाया गेल्या आहेत. तर पाण्याची टँकरची मागणी आता गावागावातून वाढू लागली आहे. मात्र प्रशासनाकडून राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात होता. जत तालुक्यातल्या 65 गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडला आहे. जत तालुक्यातल्या संख येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी चक्री उपोषण सुरू केला आहे. राज्य सरकारकडून जर पाणी देता येत नसेल, दुष्काळ जाहीर करता येत नसेल, तर आता आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी पुन्हा एकदा दुष्काळग्रस्तांनी मागणी केली आहे. Raj Thackeray : केंद्रात मंत्री मराठी, पण महाराष्ट्रातच रस्ते खराब; राज ठाकरेंचा नाव न घेता गडकरींना टोला कर्नाटक सरकारकडून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून जतच्या दुष्काळी 65 गावांना पाणी तातडीने मिळू शकतं, मात्र या बाबतीत राज्य सरकार चाल-ढकल करत आहे,याशिवाय विस्तारित म्हैशाळ योजनेला निधी मंजूर करून केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग करण्यात आल्याचा,आरोप देखील दुष्काळग्रस्तांनी केला आहे. दरम्यान, जत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनंतर राज्याची माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संबंधितांशी बोलून यासंदर्भात प्लॅन तयार केला पाहिजे. सीमाभागातील गावांचे प्रश्न समजून घेऊन दोन-तीन वर्षात मार्गी लावू असं सांगितलं पाहिजे. त्यामुळे अशा भूमिका त्या गावांना घ्यायला लागू नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या