JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'देव' पाण्यात ठेवणाऱ्यांना उत्तर मिळालं, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

'देव' पाण्यात ठेवणाऱ्यांना उत्तर मिळालं, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

संपूर्ण देश आणि महाराष्ट्र कोरोनाविरोधात लढत असताना महाराष्ट्रात काही लोकं अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते'

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आसिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 14 मे : विधान परिषद निवडणूक बिनविरोध जाहीर झाल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ‘काही तथाकथित लोकं लोकशाहीच्या गळचेपीबद्दल राज्यपालांना पत्र देत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत देव पाण्यात घालून बसले होते. मात्र, त्यांच्या प्रश्नांना आता उत्तर मिळाले आहे’, असा टोला  जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार कोरोनाविरोधात लढत असताना उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून निर्माण झालेले पेच प्रसंग आता दूर झाला आहे. अखेर या राजकीय वादानंतर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिनविरोध आमदार म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री यांनी समाधान व्यक्त केले आहे. हेही वाचा -  ‘आता त्यांच्याही कुटुंबाला मारणार’, हत्याकांडानंतर बीडमधील वातावरण तापलं ‘विधान परिषद निवडणुकीवरून निर्माण झालेले पेच सोडवण्यासाठी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याची मागणी केली होती. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाची खबरदारी घेऊन निवडणुका पार पडल्या जातील अशी विनंती केली होती’, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला. ‘संपूर्ण देश आणि महाराष्ट्र कोरोनाविरोधात लढत असताना महाराष्ट्रात काही लोकं अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. तसंच काही तथाकथित लोकांनी लोकशाहीच्या गळचेपीबद्दल  राज्यपालांना पत्र दिले होते. काही लोक देवा पाण्यात घालून बसले होते. मात्र, त्यांच्या प्रश्नांना निवडणूक कार्यक्रमामुळे उत्तर मिळाले आहे’, असा टोला जयंत पाटील यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. हेही वाचा - कोरोनामुळे कामाच्या पद्धतीत बदल; मंत्रालयांकडून वर्क फ्रॉम होमचे गाइडलाइन्स तसंच ही निवडणूक तिन्ही पक्ष मिळून लढवली आणि कोरोना विरोधातील लढाई अधिक जोमाने लढवत भविष्यात महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम करेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.  संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या