सोलापूर, 18 जानेवारी : सोलापूर जिल्ह्यात एकूण 657 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 4 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे उर्वरीत 587 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. आज सोमवारी त्याची मतमोजणी पार पडत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन गटात चुरशीची लढत होत आहे, तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यात प्रमुख लढती झाल्या. मात्र अशातच अक्कलकोट तालुक्यातील एका गावात मात्र रामदास आठवले यांच्या आरपीआयने सर्वांना अस्मान दाखलं आहे. अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचयातीत आरपीआयचा विजय झाला आहे. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्यासमवेत पूर्ण पॅनल विजयी झाला असून 7 पैकी 7 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे. यावेळी आरपीआयने स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना धक्का दिला. सोलापूर जिल्ह्यात कुठे, कोण जिंकलं? - अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी (अ) ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या पॅनेलची सत्ता - हालहळळी (अ) गावातील बिराजदार यांच्या पॅनलला 6 पैकी 6 जागांवर विजयी - अक्कलकोटमध्ये भाजपला धक्का - बार्शी तालुक्यातील मळेगावमध्ये 45 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक - निवडणुकीत विद्यमान सरपंचाचे नर्मदेश्वर विकास आघाडीचा विजय - 11 पैकी 9 जागांवर नर्मदेश्वर विकास आघाडीचा विजय - माढा तालुक्यातील घाटणे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या रवी देशमुख गटाकडे सत्ता - रवी देशमुख गटाचे 7 पैकी 5 उमेदवार विजयी - बळीराजा शेतकरी संघटनेच्या संजय पाटील घटणेकरांना धक्का - अक्कलकोट तालुक्यातील बादोले आणि बबलाद ग्रामपंचायतीत कॉंग्रेसची सत्ता -बबलाद ग्रामपंचायतीत राजकुमार लकबशेट्टी यांच्या पॅनलला 9 पैकी 6 जागा - बादोले ग्रामपंचायतीत कॉंग्रेसच्या माणिक धायगोडे यांची निर्विवाद सत्ता - बादोलेतील 11 च्या 11 जागांवर धायगोडे गटाचे उमेदवार विजयी - अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मोठा धक्का - कॉंग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांची आघाडी - दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे कॉंग्रेसच्या सत्ताधारी हसापुरे गटाचा पराभव - शिवसेनेचे दिलीप माने गटाच्या स्थानिक परिवर्तन आघाडीला मोठे यश - 9 पैकी 9 जागांवर दिलीप माने गट विजयी. - दक्षिण सोलापुरातील कुंभारी ग्रामपंचायतीची सुत्रे भाजपकडे - जिल्हापरिषदेचे साभागृहनेते आण्णाराव बाराचारे आणि शिरीष पाटील गट विजयी - 17 पैकी 13 जागांवर भाजपचा विजय - तर पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कॉंग्रेसचे आप्पासाहेब बिराजदार यांना 4 जागा स्वतः अप्पासाहेब बिराजदार पराभूत