सांगली, 23 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल. तसेच 90 टक्के राष्ट्रवादीही भाजपमध्ये विलीन होईल, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान यावर माजी उपमुख्ममंत्री आर आर पाटील यांचे चिरजीव रोहित पाटलांनी पडळकरांवर जोरदार पलटवार केला आहे.
पाटील म्हणाले कि, असा कोणताही पक्ष आणि संघटना संपत नसते. आपला जन्मच राष्ट्रवादीच्या स्थापनेबरोबर झालाय. त्यामुळे आपण तरी राष्ट्रवादीशिवाय कोठे जाऊ शकत नसल्याचे रोहित पाटील यांनी स्पष्ट केले. रोहित पाटील सांगलीमध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले की, छळ, कपट, अहंकार हे शब्द खासदार संजय काका पाटील यांच्या तोंडून येणे योग्य नाही. कवठेमहांकाळ नगरपंचायतमधील राष्ट्रवादीच्या फुटीर नगरसेवकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. पक्षाने हे गंभीरपणे घेतले आहे.
हे ही वाचा : ‘शिंदे गटातील 22 आमदार नाराज, भाजपात विलीन होणार’, शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट
नगरसेवकावर दबाव टाकला हे योग्य नाही. एवढी ताकद लावून निवडणूक चिठ्ठीवर जोरावर जात असेल तर पराभव आमचा की त्यांचा हे तपासावे लागेल. दबाव टाकून निवडणुका जिंकणाऱ्यांना लोकं थारा देणार नाहीत. मात्र मत पेटीतून लोकं उत्तर देतील, असंही ते म्हणाले.
कवठमहांकाळमध्ये चिठ्ठी सरकार आहे. राजकीय पार्श्वभूमी नसणारे लोक निवडून आले. लोकांनी संधी दिली. शेवटच्या टप्प्यात आणि पैशाचे आमिष यामुळे ते बदलले. आम्हाला गर्व आलाय, हे लोकांचा पाठिंबा पाहता वाटत नाही. विजयाच्या आणि पराभवाच्या गर्तेत आम्ही अडकलो नाही. पराभव होऊनही आम्ही लोकांसाठी काम करत होतो. असे रोहित पाटील म्हणाले. राष्ट्रवादीने ताकदीने आम्हाला साथ दिली आहे. पक्षाचा नेहमीच आशीर्वाद दिलाय तो यापुढेही राहील. ते वाक्य विकासाबाबत होते. त्यांनी ते बघीतलं नसावे. राजकारणात कोण संपत नसते, असंही राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना सुनावले.
रोहीत पाटलांना पराभवाचा धक्का
मागच्या दहा महिन्यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा चिरंजीव रोहीत पाटील यांने कवटेमहांकाळ नगरपरिषदेत सत्ता काबीज केली होती. खासदार संजय काका पाटील यांना रोहीत पाटील यांनी चांगलाच धक्का दिला होता. परंतु अवघ्या 10 महिन्यात संजय काका पाटील यांच्या गटाकडून रोहित पाटील गटाला धोबीपछाड दिल्याने कवठेमंकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला.
हे ही वाचा : CM च्या पक्षातील नेताच म्हणतो, ‘एकनाथ शिंदेंचा होणार रामदास आठवले’, शिवसेनेचा खुलासा
संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान दोन्ही गटातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिट्टीद्वारे निवड करण्यात आली यामध्ये गावडे यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडली.