JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रुग्णालयाचा भोंगळ कारभार, पेणमध्ये संतप्त नागरिकांचं आंदोलन

रुग्णालयाचा भोंगळ कारभार, पेणमध्ये संतप्त नागरिकांचं आंदोलन

योग्यवेळी उपचार न मिळाल्याने सारा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. साराच्या मृत्यूने जिते गावावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात

सर्प दंश झाल्याने सारा ठाकूर बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, प्रतिनिधी पेण, 29 जुलै : सर्प दंश झाल्याने सारा ठाकूर बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पेण तालुक्यातील जिते गावात ही घटना मंगळवारी घडली होती. योग्य उपचाराअभावी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. साराला मंगळवारी रात्री मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केल्याचं समोर आलं. तिला उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे उपचार न झाल्याने पेण येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे देखील उपचार करण्यात आले नाहीत. त्यानंतर अलिबाग जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर कळंबोली येथील रुग्णालयात नेलं.

योग्यवेळी उपचार न मिळाल्याने सारा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. साराच्या मृत्यूने जिते गावावर शोककळा पसरली आहे. याच घटनेचा निषेध म्हणून पेण तालुक्यातील गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेकडोच्या संख्येने आंदोलकांनी रुग्णालयावर धडक दिली. मेणबत्त्या लावून सराच्या मृत्यूला जबाबदार डॉक्टरांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या पुढे अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, रुग्णालयात एकही रुग्ण वाहिका नसून आरोग्याचा बे भरवशी कारभार बंद व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या