प्रातिनिधिक फोटो
गणेश दुडम, मावळ 15 ऑक्टोबर : अपघाताची एक घटना समोर आली आहे. यात पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर दोन ट्रकचा अपघात झाला. या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईवरुन मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला आहे. भिवंडीत मोठी दुर्घटना, चार जणांवर वीज कोसळली, दोघांचा मृत्यू पहाटे चार वाजता पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ही घटना घडली. पहाटे साखर झोपेत असलेल्या चेन्नईवरून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक चालकाने मागून दुसऱ्या मालवाहू ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दोन्ही वाहनं मुंबईच्या दिशेने जात होती, तेव्हाच खोपोलीच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीम आणि बोरघाट पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. विवाहित भाच्यावर जडलं प्रेम; महिलेला गावकरांनी दिली आयुष्यभराची शिक्षा भिवंडीत मोठी दुर्घटना - दरम्यान भिवंडीतूनही शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना समोर आली होती. भिवंडीत चार जणांवर वीज कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. संबंधित घटना ही भिवंडी तालुक्यात पिसे ग्रामपंचायत हद्दीतील चिराडपाडा या आदिवासी वस्तीत घडली. या दुर्घटनेत दोन तरुणींचा जागीच मृत्य झाला. भिवंडी परिसरात शुक्रवारी विजेच्या कडकडाटात सुरु असलेल्या परतीच्या पावसात तालुक्यातील फुलोरे पाडा इथं खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चौघांवर वीज पडली. या दुर्घटनेत एका तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एका मुलासह महिला जखमी झाली आहे.