JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rajya Sabha: फडणवीसांनी गणित जुळवलं, राज्यसभा निवडणूक निकालाचा राज्यसरकारवर परिणाम? शरद पवारांनी म्हटलं...

Rajya Sabha: फडणवीसांनी गणित जुळवलं, राज्यसभा निवडणूक निकालाचा राज्यसरकारवर परिणाम? शरद पवारांनी म्हटलं...

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्याचं पहायला मिळालं. भाजपने आपला तिसरा उमेदवार विजयी करुन दाखवत शिवसेनेला एक झटका दिला आहे.

जाहिरात

फडणवीसांनी गणित जुळवलं; राज्यसभा निकालामुळे मविआला धक्का, ठाकरे सरकारला धोका?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 11 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल (Rajya Sabha Election Result) रात्री उशीरा जाहीर झाले. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजपच्या गोटात एकच जल्लोष सुरू झाला. तर भाजपने आपला तिसरा उमेदवार विजयी करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांनी संख्याबळ मिळवत गणित जुळवलं आणि धनंजय महाडिक यांना विजयी करुन दाखवलं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या खेळीमुळे आता ठाकरे सरकार धोक्यात आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकार अस्थिर? शरद पवार म्हणाले, या निकालाचा सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार नाही. तुम्ही कॅल्युलेशन पाहा ना… तुम्ही सर्व संख्या पाहिली तर सरकार चालवण्यासाठी जी संख्या आहे त्याच्यात काहीही धक्का नाही. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाहीये. चमत्कार मान्य केला पाहिजे ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदरीत संख्येप्रमाणे मतदान झालं आहे. जो चमत्कार झालेला आहे तो मान्य केला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं आपलीशी करणं विविध मार्गाने, त्या मार्गाने त्यांना यश आलं. मतमोजणी बाबत झालेला उशीर म्हणजे भाजपचा रडीचा डाव असंही शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मतं संजय राऊत- 41 प्रफुल्ल पटेल- 43 -2 ईम्रान प्रतापगडी- 44 - 3 संजय पवार- 33 भाजपच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीचे मतं अनिल बोंडे- 48 पियुष गोयल- 48 धनंजय महाडिक 27 वाचा : महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ’; निकालाचा हायव्होल्टेज ड्रामा, मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर मतांचे समीकरण संजय पवार यांना मिळालेली मतं 33+2 = 34 संजय पवार यांना 33 मते मिळाली त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली 43 मते त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत उरलेली 2 तर प्रतापगडी यांना मिळालेली 44 मते त्यातील 41 चा कोटा पाहता 3 मत शिल्लक राहतात. त्यामुळे संजय पवार यांना 38 मते मिळाली. धनंजय महाडिक यांना मिळालेली मतं 27+7+7 = 41 धनंजय महाडिक यांना 27 तर पियुष गोयल यांना 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते. तर अनिल बोंडे यांना ही 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते मिळाली. 27 अधिक पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची 14 मते अशी धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली यामध्ये महाडिक यांचा विजय झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या