JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Porn च्या व्यसनातून पुण्यातल्या तरुणाचं शेजारणींसोबत धक्कादायक कृत्य; मोबाइलमध्ये सापडले 40 हजार अश्लील Video

Porn च्या व्यसनातून पुण्यातल्या तरुणाचं शेजारणींसोबत धक्कादायक कृत्य; मोबाइलमध्ये सापडले 40 हजार अश्लील Video

पॉर्न पाहण्याच्या व्यसनातून एका तरुणानं शेजार-पाजारी राहणाऱ्या महिलांचेच फोटो मॉर्फ (Photo Morf) करून अश्लील व्हिडीओ (porn Video) बनवण्यासाठी वापर केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 18 जानेवारी: अलीकडच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून मोबाइलवर विविध प्रकारचा व्हिडीओ कंटेंट बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. विशेषत: अश्लील फोटो, व्हिडिओ म्हणजेच पॉर्न कंटेंट (Porn content) बघण्याच्या व्यसनात एक मोठा वर्ग अडकल्याचं आढळत आहे. यात तरुणाईची संख्या अधिक आहे. अशा व्यसनातूनच एका तरुणानं शेजार-पाजारी राहणाऱ्या महिलांचेच फोटो मॉर्फ (Photo Morf) करून अश्लील व्हिडीओ (porn Video) बनवण्यासाठी वापर केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुणे मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय शुभम आवाडे (Shubham Awade) नावाच्या तरुणाला अटक केली असून, त्यानं त्याच्या शेजारच्या महिलांच्या फोटोंशी छेडछाड करून पॉर्न व्हिडीओ बनल्याचं उघड झालं आहे. गेल्या 6 महिन्यांपासून तो असे पॉर्न व्हिडिओ बनवत असल्याचं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे. पोलिसांना त्याच्या मोबाइलमध्ये तब्बल 40 हजार अश्लील व्हिडीओ आणि 5 हजार फोटो सापडले आहेत. हे वाचा- भयंकर! बळी देताना बकऱ्याऐवजी छाटली बोकड पकडणाऱ्याची मान, तडफडून मृत्यू आवाडे विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि आयटी कायद्याच्या कलम 354 (A), 469 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं खडकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितलं. हे व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर टाकले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी शुभम आवाडे याच्या ओळखीच्या व्यक्तीनेच तक्रार दाखल केली आहे. त्यानं सांगितलं की, ‘शुभम आणि मी अनेकदा बोलायचो. एकदा तो त्याच्या फोनवर काहीतरी दाखवत असताना, आमच्यापैकी अनेकांनी त्याची फोटो गॅलरी (Photo Gallery) बघितली तेव्हा त्यामध्ये अनेक अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यातले काही फोटो त्यानं मॉर्फ केलेले असून, ते आसपास राहणाऱ्या महिलांचेच फोटो आहेत, असं लक्षात आल्यावर आम्ही त्याला त्याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं आम्हाला खोटं काहीतरी सांगितलं. आपले असे अश्लील फोटो पाहून महिलांनाही धक्का बसला नंतर शुभमच हा उद्योग करत असल्याचा खुलासा झाल्यानंतर आम्ही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.’ हे वाचा- मंदिरात गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; नराधमाने जंगलात नेऊन दिल्या नरक यातना या परिसरातील एका रहिवासी महिलेनं सांगितलं की, जेव्हा तिनं आरोपीच्या मोबाइलमध्ये आपल्या मैत्रिणीचा फोटो पाहिला तेव्हा तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याला चांगलं ओळखणाऱ्या माझ्या एका मित्रानं मला याबद्दल सांगितलं होतं. शुभम यानं सोशल मीडिया अकाउंटवरून त्या मुलीचा फोटो घेतला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या