पुणे 28 जून : मुंबई महानगरपालिकेकडून पाणी कपातीचा (Water cut by BMC) निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लगेचच ठाणे महानगरपालिकेसुद्धा (TMC) याच संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला. यापाठोपाठ आता पुणेकरांसाठीही वाईट बातमी आहे. पुणेकरांनाही आता पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे (Water Cut in Pune). Pune : वाघोली, लोणीकंदमध्ये उद्या 4 तास लाईट जाणार; ‘हे’ आहे महत्त्वाचं कारण पुण्यातल्या धरण साखळीत पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आज महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच याबाबतचं सविस्तर वृत्त समोर येईल. मुंबईतही करण्यात आलीये पाणीकपात - मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस प़डला आहे. त्यामुळे सध्यच्या परिस्थितीत तलावांमध्ये अत्ंयत कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही 10 टक्के पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यालाही लागू आहे. Pune : फूटपाथवरच्या ‘त्या’ वंचित लेकरांनी केली मेट्रोची सवारी, दादाच्या शाळेनं पार पाडली जबाबदारी जून महिन्यातील पाऊस मागील वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 70 टक्के कमी आहे, असे महापालिकेने सांगितलं आहे. यामुळे पुण्यातही धरण साखळीत पाण्याची पातळी घसरली बरीच घसरली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. यासोबतच पाणीकपातीचा सामनाही करावा लागण्याची शक्यता आहे. पाणीकपात झाल्यास पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल.