Home /News /maharashtra /

Pune : वाघोली, लोणीकंदमध्ये उद्या 4 तास लाईट जाणार; 'हे' आहे महत्त्वाचं कारण

Pune : वाघोली, लोणीकंदमध्ये उद्या 4 तास लाईट जाणार; 'हे' आहे महत्त्वाचं कारण

लोणीकंद येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात तातडीची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवारी (26 जून) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी आणि इतर परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

    पुणे, 25 जून : महापारेषण कंपनीच्या लोणीकंद येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात तातडीची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवारी (26 जून) सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी आणि इतर परिसरात वीजपुरवठा बंद (electricity cut) राहणार आहे. याबाबत संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येत आहे, असे महावितरणकडून (MSETCL) सांगण्यात आले आहे. (4 hours electricity cut planned in wagholi lonikand areas tomorrow) वाचा : शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न, भाजप खासदार भडकले, शिवसैनिकांना दिला इशारा याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या अतिउच्चदाब लोणीकंद उपकेंद्रामध्ये वीज पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रिक दुरुस्तीचे काम तातडीने  करणे आवश्यक आहे. हे काम रविवारी (26 जून) रविवारी करण्यात येणार आहे. या कामामुळे महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या एकूण सहा वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत बंद ठेवण्यात येईल. वाचा : VIDEO : शिवसैनिकांचा राडा! आमदार तानाजी सावंतांचे कार्यालय फोडले या कालावधीत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी, संघर वेअर हाऊस आणि तुळापूर, भावडी, जगताप वस्ती, बायफ रस्ता, लोहगाव रस्ता, आवलवाडी रस्ता, साई सत्यम पार्क, उबले नगर परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. या अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण आणि महावितरणकडून करण्यात आले आहे.
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या