Home /News /maharashtra /

Pune : फूटपाथवरच्या 'त्या' वंचित लेकरांनी केली मेट्रोची सवारी, दादाच्या शाळेनं पार पाडली जबाबदारी 

Pune : फूटपाथवरच्या 'त्या' वंचित लेकरांनी केली मेट्रोची सवारी, दादाच्या शाळेनं पार पाडली जबाबदारी 

पुणे मेट्रो.

पुणे मेट्रो.

पुण्याच्या फुटपाथवरील त्या वंचित मुलांच्या अपेक्षांकडे सर्वांचच लक्ष असतं, असं नाही. पण, दादाची शाळा या स्वंयसेवी संस्थेने त्या निरागस चेहऱ्यांकडे पाहुन आणि भोळ्या इच्छेकडे पाहून त्यांना मेट्रोची सफर घडवून आणली.

    पुणे, 18 जून : पुण्यात दोन महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात मेट्रो (Pune Metro) दाखल झाली आणि पुणेकरांनी मेट्रोचा आनंद घेतला. पण, हाच आनंद शहरात फूटपाथवर राहणाऱ्या आणि सिग्नलवर पेन, फुगे, फुले, खेळणी विकणाऱ्या दुर्लक्षित मुलांनाही (Disadvantaged Children in Pune City) घेता यावा, यासाठी 'दादाची शाळा' या स्वयंस्वेयी संस्थेने पुढाकार घेतला आणि आज फूटपाथवरील लहानग्यांनी (Children on the sidewalk) मेट्रोचा अविस्मरणीय आनंद घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद इतर प्रवाशांना आणि आयोजकांनाही सुखावून गेला. वाचा : Viral Video: कुत्र्यानं केला प्रँक, मालकाची झाली ‘ही’ अवस्था; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल आज सायंकाळी गरवारे मेट्रो स्टेशनवर खूप सारी निरागस मुले आणि त्यांच्यासोबत दादाची शाळाचे सगळे स्वयंसेवक त्या लहानग्यांना मेट्रोची माहिती देत होते. मात्र, दुसरीकडे त्या मुलांची मेट्रोमध्ये पहिल्यांदाच प्रवास करण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्या भिरभिणाऱ्या मुलांचा नजरा मेट्रो कधी एकदा स्टेशनवर आणि कधी एकदा आम्ही त्यामध्ये बसून प्रवास करतो, असं त्यांना झालं होतं. मेट्रो जवळ येताच लहानग्यांनी जल्लोष सुरू केला. मेट्रोचा दरवाजा उघडताच तो स्वयंचलित दरवाजा उघडताच हा लहान मुलांचा गलका 'गणपती बप्पा मोरया' म्हणत आतमध्ये मोठ्या जोशाने शिरला. आणि सुरू झाला एकदाचा तो मेट्रोचा प्रवास. मिळेल तशी जागा पकडून मेट्रोच्या भल्यामोठ्या काचेच्या खिडकीतून बाहेरचा नजारा आश्चर्याने ही मुले पाहत होती. बाहेरचे रखरखत्या उन्हाची त्यांची सवय त्यांना होतीच. मात्र, मेट्रोच्या एसीची हवा त्यांना शांततेचा अनुभव देत होती. त्यातदेखील ही मुले मोठ्या आनंदाने दंगामस्ती गुंतली होती. वाचा : Kon Honaar Crorepati: सुधा मूर्ती यांना मराठी संस्कृती वाटते जवळची, शेअर केल्या खास आठवणी दादाची शाळाचे संस्थापक अभिजीत पोखरणीकर म्हणाले की, "ही सर्व मुलं पुण्यातील विविध रस्त्यांवर फुगे, खेळणी, फुले, कचऱ्याच्या पिशव्या विकून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. दुसरीकडे तर दादाच्या  शाळेत शिकतात. त्यांच्यासमोर एक चकचकीत चांगलं जग आहे. पण, ते त्यांचं नाही. अशा जगात जागा निर्माण करण्यासाठी धडपड आहे. त्यांनादेखील मेट्रोमधून फिरायचं होतं. या मेट्रोच्या सफरीमुळे मुलांना तर मोठा हुरूप आला आहे. हाच त्यांचा आनंद आठवडाभर टिकेल आणि चांगला अभ्यास करतील", अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
    First published:

    Tags: Maharashtra News, Pune, Pune metro, महाराष्ट्र

    पुढील बातम्या