JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, शूटर्सचं महाराष्ट्र कनेक्शन समोर; 8 पैकी 2 जण पुण्यातील

सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, शूटर्सचं महाराष्ट्र कनेक्शन समोर; 8 पैकी 2 जण पुण्यातील

Sidhu Moosewala Murder: सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे. यामध्ये पुण्यातील दोन शूटरचाही समावेश असून संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी त्यांची नावं आहेत

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 06 जून : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (punjabi singer sidhu moosewala) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेला आता जवळपास आठवडा झाला आहे. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. गायकाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. आता या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलं आहे (Maharashtra Connection with Moosewala’s Murder). मूसेवालाच्या हत्येसाठी एकूण 8 शूटर बोलावण्यात आले होते. यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे शूटर मागवण्यात आले होते. यामध्ये पुण्यातील दोन शूटरची नावं समोर आली आहेत. सिद्धू मूसेवाला यांना असा साजरा करायचा होता आपला वाढदिवस, प्लॅनही होता तयार समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे. यामध्ये पुण्यातील दोन शूटरचाही समावेश असून संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी त्यांची नावं आहेत. सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रातून बोलावण्यात आले होते. यात पंजाब आणि राजस्थानमधील प्रत्येक 3 तर महाराष्ट्रातील दोन शूटरचा समावेश होता. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ बाणखेले खून प्रकरणातील मोक्काचे फरार आरोपी आहेत.. दोन वर्षापासून दोघंही फरार आहेत. आता ते पंजाबमध्ये राहात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली आहे. नेमकं काय घडलं होतं? पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (punjabi singer sidhu moosewala) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली होती. काल सुरक्षा हटवली; आज प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या मुसेवाला यांच्या एकूण 23 जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं. 14 ते 15 गोळ्या मुसेवालांच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या. या हल्ल्यात मुसेवालाच्या शरीरवर तब्बल तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंतच्या खोल जखमा दिसून आल्या होत्या. सध्या पंजाब पोलीस हा हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या