मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धू मूसेवाला यांना असा साजरा करायचा होता आपला वाढदिवस, प्लॅनही होता तयार

सिद्धू मूसेवाला यांना असा साजरा करायचा होता आपला वाढदिवस, प्लॅनही होता तयार

सिद्धू मूसेवाला हे पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मूसा गावचे होते. त्याची आई गावातील प्रमुख आहे. पंजाबमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर, ते 2016 मध्ये स्टडी व्हिसावर कॅनडाला गेले. 2017 मध्ये, त्याने त्याचा पहिला ट्रॅक 'सो हाय' (So High) रिलीज केला.

सिद्धू मूसेवाला हे पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मूसा गावचे होते. त्याची आई गावातील प्रमुख आहे. पंजाबमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर, ते 2016 मध्ये स्टडी व्हिसावर कॅनडाला गेले. 2017 मध्ये, त्याने त्याचा पहिला ट्रॅक 'सो हाय' (So High) रिलीज केला.

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) यांच्या निधनाने कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्या आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ही दुःखद बातमी समोर आल्यापासून सेलिब्रिटी आपापल्या सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत करत आहेत. सोबतच त्यांच्यासोबतच्या काही आठवणीदेखील शेअर करत आहेत. संगीतकार सलीम मर्चंट (Salim Merchant) यांनीही सोशल मीडिया अकाऊंटवर सिद्धू यांच्या निधनानंतर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 31 मे-   पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला   (Sidhu Musewala)   यांच्या निधनाने कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्या आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ही दुःखद बातमी समोर आल्यापासून सेलिब्रिटी आपापल्या सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत करत आहेत. सोबतच त्यांच्यासोबतच्या काही आठवणीदेखील शेअर करत आहेत. संगीतकार सलीम मर्चंट  (Salim Merchant)  यांनीही सोशल मीडिया अकाऊंटवर सिद्धू यांच्या निधनानंतर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर दिवंगत गायकासोबतचा एक फोटो शेअर करत सलीमने खुलासा केला आहे की तो सिद्धूसोबत एका गाण्यावर काम करत होता आणि ते गाणं लवकरच रिलीजदेखील होणार होतं. सलीम यांनी पोस्ट शेअर करत लिहिलंय, “सिद्धू आता या जगात नाही हे समजल्यापासून मला धक्का बसलाय, मी सुन्न झालोय . हे अविश्वसनीय आहे. आम्ही लवकरच एक गाणं रिलीज करणार होतो.” सलीमच्या या पोस्टवर अनेक गायकांनी कमेंट करत सिद्धूच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली आहे. सलीम म्हणाले की, गाणं रिलीज होण्याच्या काही दिवस आधी अशा बातम्या येणं म्हणजे धक्का बसल्यासारखं आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सलीम म्हणाले की, 'मी विश्वास ठेवू शकत नाही की हे खरंच घडलं आहे. सिद्धू एक महान माणूस होता'. सलीम यांनी पुढे म्हटलं, “सिद्धू एक दयाळू, आदरणीय आणि सर्वांशीच मृदू बोलणारा माणूस होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी सिद्धूला भेटलो होतो. गायिका अफसाना खानसोबत मी एका प्रोजेक्टवर काम केलं होतं. तिने त्यांच्याबद्दल खूप सांगितलं होतं.इतकंच नव्हे तर तिने सिद्धू यांच्यासोबत एखादं गाणं करण्याचा आग्रह मला केला होता. योगायोगाने माझ्याकडे एक पंजाबी गाणं होतं. मला वाटलं हे गाणं फक्त सिद्धूच गाऊ शकतो. म्हणून मी चंदीगडला गेलो आणि त्याला भेटलो''. (हे वाचा:Sidhu Moosewala Passed Away: पंजाबी गाणी ते काँग्रेसमध्ये प्रवेश असा राहिला सिद्धू मूसेवाला यांचा प्रवास ) याबाबत आणखी सांगताना सलीम म्हणाले, “गेल्या वर्षी हे गाणं ऑक्टोबरमध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर आम्हाला रिलीज करायचं होतं. पण नंतर निवडणुका आल्या आणि तो त्या कामात व्यग्र झाला. त्यामुळे रिलीज पुढे ढकलावी लागली. निवडणुकीनंतर आम्ही दोघेही आपापल्या कामात व्यग्र असल्याने आम्हाला आणखी विलंब करावा लागला. अखेरीस, आम्ही ते जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. आम्ही रिलीजपासून फक्त दोन आठवडे दूर होतो आणि ही दुर्घटना घडली.त्यामुळे मी सुन्न झालोय. सिद्धू मुसेवाला 11 जून रोजी त्यांचा 29 वा वाढदिवस साजरा करणार होते. मात्र त्याआधीच त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला. सलीमने यांनी खुलासा करत सांगितलं की, सिद्धूने यावेळी आपला वाढदिवस देसी पंजाबी स्टाईलमध्ये साजरा करण्याची योजना आखली होती. वाढदिवसानिमित्त तो आमचं नवीन गाणं घेऊन येणार होता. प्लॅनिंगनुसार आम्ही लवकरच या गाण्याचे पोस्टर रिलीज करणार होतो. मात्र त्याआधीच अशी घटना घडली, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.
First published:

Tags: Entertainment, Punjab, Singer

पुढील बातम्या