JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! मित्रानेच केला घात, पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

धक्कादायक! मित्रानेच केला घात, पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

Gang Rape in Pune: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी परिसरात एका 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात

मुलगी घरी एकटीच असताना तो घरात शिरला. त्याने बॉटलमधून आणलेले पाणी तिला पाजले. त्यानंतर चक्कर येऊन तिला झोप आली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी, 21 डिसेंबर: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) परिसरात एका 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार (19 years old woman gang raped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी पीडित तरुणीला आपल्या फ्लॅटवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणीचे विवस्त्र फोटो देखील आपल्या मोबाईलमध्ये क्लिक (Clicked nude photos) केले. संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी (threat to viral nude photo) देत आरोपीच्या मित्रांनी देखील तरुणीवर सामूहिक अत्याचार केला आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पण सामूहिक बलात्काराची घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीचा मित्र प्रथमेश उर्फ सनी खैरे याच्यासह स्वराज कदम आणि अन्य एका अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश हा पीडित तरुणीचा चांगला मित्र आहे. 15 डिसेंबर रोजी आरोपी प्रथमेश यानं पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं. हेही वाचा- पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी प्रकार; महिलेला घनदाट जंगलात नेत केलं भयंकर कृत्य यावेळी संधी साधून आरोपी प्रथमेश याने पीडितेशी जबरदस्ती करत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी आरोपीनं पीडित तरुणीचे नग्नावस्थेतील फोटो देखील काढले. या प्रकारानंतर प्रथमेशचा मित्र स्वराज कदम यानेही पीडितेवर बलात्कार केला. सामूहिक अत्याचार झाल्यानंतर पीडित तरुणी आपल्या घरी जात असताना, आरोपी प्रथमेश याने पीडितेला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, तिला परत फ्लॅटवर बोलावलं. हेही वाचा- 12 वर्षांनी लहान तरुणावर महिलेचं जडलं प्रेम; अडसर ठरणाऱ्या पतीचा असा काढला काटा याठिकाणी गेलं असता प्रथमेशच्या दोन मित्रांनी पुन्हा पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीनं पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी सनीसह त्याच्या दोन मित्रांविरोधात सामूहिक बलात्काराची फिर्याद दाखल केली. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, हा गुन्हा सांगवी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या घटनेचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या