प्रातिनिधिक फोटो
राहुल खंदारे, बुलडाणा 19 नोव्हेंबर : अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. यातील काही अपघात इतके भीषण असतात की त्यात लोकांना जीवही गमवावा लागतो. मात्र, आता एका विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे.. ही घटना बुलडाण्यातील आहे.. यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाचा अपघात झाला. या वाहनाने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांला धडक दिली. हा पोलीस कर्मचारी खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलेलं नाही. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेमध्ये पोलीस गाडी चालवली. यावेळी पोलीस गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्याने 3 वाहनांना धडक दिली. नंतर अपघातग्रस्त पोलीस वाहन एका झाडावर जाऊन आदळलं. गाडीचा चालक नशेत असल्याने सदरची घटना घडली. Video : गंगापूर रोडवर दोन कारचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार, गाड्यांचा चुराडा औरंगाबादमध्ये भीषण अपघात रस्ते अपघात दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. देशात रस्ते अपघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या गंभीर आहे. अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी पाऊलं उचलली जात आहेत. मात्र, त्यानंतरही अपघात कमी होताना दिसत आहे. असाच एक धक्कादायक अपघात गंगापूर रोडवरील कायगावजवळही घडला. हा अपघात इतका भीषण होता की यात चार जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव जवळ शुक्रवारी दोन कारचा भीषण अपघात झाला. स्विफ्ट आणि वॅग्नर कार एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत.