JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दहावीचा पहिलाच पेपर देऊन घरी जात होती, तेवढ्यात भयानक घडलं, पंढरपूर हादरलं

दहावीचा पहिलाच पेपर देऊन घरी जात होती, तेवढ्यात भयानक घडलं, पंढरपूर हादरलं

दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडला आहे. या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 2 मार्च : दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडला आहे. या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राधा नागनाथ आवटे ही विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देऊन घरी जात होती, तेव्हा तिच्या अंगावर जळणारं झाड पडलं. पंढरपूर तालुक्यातल्या करकंब जवळच्या बार्डी रोडवर ही घटना घडली आहे. राधा आवटे पेहे येथील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देऊन घरी परत जात होती, तेव्हाच हा अपघात झाला. या अपघातामध्ये दहावीची विद्यार्थिनी असलेल्या राधा आवटेच्या अंगावर जळणारं झाड पडलं. या झाडाला नेमकी आग कशी लागली, याचा तपास यंत्रणा करत आहेत. 16 वर्षांची राधा नागनाथ आवटे बादलकोटची राहणारी होती. दहावीचा पेपर संपल्यानंतर राधा तिचा भाऊ संदीप याच्या सोबत मोटारसायकल वरून ढेकळेवाडीला नातेवाईकांकडे जात होती. बार्डी रोड वरील एमएसईबी कार्यालयाच्या पुढे रस्त्याच्या बाजूला असलेलं पेटलेलं झाड राधाच्या अंगावर पडलं, त्यामध्ये राधाच्या डोक्याला जोराचा मार लागला. अपघातानंतर राधाला करकंब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच राधाचा मृत्यू झाला. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दहावीच्या परीक्षेला आजपासूनच सुरूवात झाली आहे. दहावीचा आज मराठीचा पहिला पेपर होता. 2 मार्च ते 25 मार्चपर्यंत दहावीची परीक्षा होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दोन वेळांमध्ये घेण्यात येत आहे. यातल्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजता तर दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजता पेपर द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी परीक्षाकेंद्रावर पोहोचणं बंधनकारक आहे. यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सुरूवातीची 10 मिनिटं प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिला जाणारा वेळ मिळणार नाही. कॉपीचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे, त्याऐवजी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी ही 10 मिनिटं मिळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या