JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राष्ट्रवादीला धक्का देत विधानसभेआधी धनराज महालेंचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीला धक्का देत विधानसभेआधी धनराज महालेंचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर धनराज महाले यांनी हाती शिवबंधन बांधलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑगस्ट : दिंडोरीतून राष्ट्रवादीच्या तिकीटावार लोकसभा निवडणूक लढवलेले धनराज यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर धनराज महाले यांनी हाती शिवबंधन बांधलं. धनराज महाले हे मूळ शिवसेनेचेच नेते आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने दिंडोरीतून धनराज महाले यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत भारती पवार यांनी धनराज महालेंचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनराज महाले यांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीला दुहेरी धक्का बसला आहे. कारण आधी लोकसभेत महालेंना तिकीट दिल्याने भारती पवारांनी पक्ष सोडला. त्यानंतर आता धनराज महालेही राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत दिंडोरीची जागा युतीत शिवसेनेकडे आहे. त्यमुळेच महाले यांनी स्वगृही परतण्याचा घेतला निर्णय घेतला. धनराज महालेंच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या