JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / किरीट सोमय्यांच्या बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाल्या...

किरीट सोमय्यांच्या बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाल्या...

‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते. त्यामुळे…’

जाहिरात

'बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते. त्यामुळे...'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 05 ऑक्टोबर : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ( kirit somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्र्यांवर एकापाठोपाठ गंभीर आरोप केले आहे. आता किरीट सोमय्या हे उद्या बारामतीला (baramati) जाणार आहे. ‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी टोला लगावला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या दौंड दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी उत्तर प्रदेशातल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर इथं शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. डोंबिवली हादरली, तरुणाचा आढळला छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह किरीट सोमय्या उद्या बारामती दौऱ्यावर येत आहेत, याबाबत पत्रकारांनी विचारले असता काही से मिश्किल हास्य करत सुळे म्हणाल्या की, ‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते. त्यामुळे सोमय्या यांचं बारामतीला येणे काही नवीन नाही’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत जास्त बोलणे टाळले. आजीच्या वयातल्या ‘तरुणीवर’ भुलतायत विशीतली मुलं तसंच, अभिनेता शाहरुख खान याच्या मुलावर एनसीबीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना एनसीबीने केलेल्या कारवाईतून सत्य बाहेर येईलच. मी स्वतः तंबाखू आणि गुटख्याबाबत आंदोलन करत असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात गुटखा बंदी केली. त्यानंतर संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी झाली. यासंदर्भात शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्याची गरज आहे’ असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या