JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / इंदुरीकर महाराजांच्या लस न घेण्याच्या वक्तव्यावर राजेश टोपेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

इंदुरीकर महाराजांच्या लस न घेण्याच्या वक्तव्यावर राजेश टोपेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

‘जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणलं आहे. महाराजांचा आध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र..’

जाहिरात

'जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणलं आहे. महाराजांचा आध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र...'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 03 नोव्हेंबर : लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर ( indurikar maharaj ) यांनी कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccination) घेणार नाही, असं वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी इंदुरीकर यांच्या वक्तव्याबाबत त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले आहे. बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी कोरोनाच्या लसीकरणाबद्दल माहिती दिली. तसंच इंदुरीकर महाराज यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केलेल्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते. त्यामुळे त्यांच्या किर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजातील जास्त संपर्क आला नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली नसावी.  जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणलं आहे. महाराजांचा आध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र,  वैज्ञानिक बाजू देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. पुढील 5 दिवस पुण्यात मेघर्जनेसह कोसळणार पाऊस; मुंबई-ठाण्यालाही IMD कडून इशारा तसंच,  राज्यात 7 कोटी लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. 3 कोटी लोकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. महाराष्ट्राचे जे टार्गेट आहे त्याच्या 73 टक्के पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झालं आहे. जर केंद्र आणि राज्याच्या आकडेवारीमध्ये फरक असेल तर आपण जुळवणी करण्याचा काम करू, असंही टोपे म्हणाले. Diwali Party: दिव्यांका त्रिपाठी ते अली गोनी कलाकारांनी फेस्टिव्ह LOOK मध्ये…. कोविन अॅपवर अतिशय पारदर्शक डेटा असतो त्यावर पूर्ण आकडेवारी आहे पहिल्या दिवशीपासून आपण कधीही आकडे लपवले नाहीत. आमचे आकडे खरे आहेत. त्यामुळे दिशाभूल करण्याच काहीही कारण नाही, असंही टोपे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या