मुक्ताईनगर, 2 डिसेंबर: सुमारे दीड हजार कोटी रुपयांवर आर्थिक गैरव्यवहार असलेल्या बीएचआर मल्टिस्टेट सोसायटी प्रकरणी चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या मागणीसाठी स्वत: एकनाथ खडसे यांच्यासह खासदार रक्षा खडसे, अॅड.कीर्ती पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यावेळी राजकीय दबाव होता, मात्र आता यंत्रणेने हा दबाव झुगारून चौकशी सुरू केली आहे. यात अनेक मोठी नावे पुढे येणार असल्याचे माजी मंत्री खडसे यांनी सांगितलं. तसेच एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. जळगाव ब