मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या राजीनाम्याबाबत खुलासा केला आहे. ‘शरद पवार यांचा काहीही संबंध नसतानाही त्यांच्यावर होणाऱ्या गंभीर आरोपामुळे व्यथित होऊन मी राजीनामा दिला,’ असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. यावेळी अजित पवार कमालीचे भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं. ‘या प्रकरणात अजित पवार हे नाव नसते तर ही केसच उभी राहिली नसती. माझ्या आडून शरद पवारांना टार्गेट केलं जातं आहे. 25 हजार कोटी घोटाळा झालेली बँक 250 कोटीच्या फायद्यात कशी असेल हो,’ असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे: - पवार कुटुंबात कोणताही कलह नाही - आपल्या घरातील आपल्या घरातील प्रमुखाला असा त्रास होत असेल तर त्यातून व्यथित झालो - काल माझा राजीनामा सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून दिला - मी कुणाला काही सांगितले नाही, त्यांना वेदना झाल्या असतील - जर मी राजीनामा देणार असं सांगितलं असतं तर ते मला कुणी देऊ दिला नसता - काही दिवसांपासून राजीनामा देण्याचा विचार सुरू होता हेही वाचा- राजू शेट्टी यांची ‘स्वाभिमानी’ निवडणूक लढवणार, एवढ्या जागांवर केला दावा - मी जिल्हा बँकेच्या आणि राज्यसहकारी बँकेत काम करत होतो, त्यावर कारवाई झाली - शरद पवार यांचा कुठे संबंध नाही मग त्यांचं नाव माझ्या मुळे येतं का ? माझ्या मुळे शरद पवार यांची बदनामी होते का? या मुळे व्यतिथ झालो आहे - भविष्यात पक्ष सांगेल तो निर्णय मान्य आहे दरम्यान, राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. हेही वाचा- शिवसेना नेते संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला स्वत:च ईडी कार्यालयात हजर होतो, असं म्हणत शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांना अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता. एकीकडे ईडी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली होती. पवार कुटुंबात खरंच गृहकलह? मनोहर जोशी काय म्हणाले, पाहा UNCUT VIDEO