संपूर्ण देशात गाजलेलं सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण अद्याप संपलेलं नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. सुशांत ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं न्यायालयासमोर 12 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं आहे. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर CBI द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु होती. दरम्यान ड्रग्जचं प्रकरण समोर आलं. तेव्हापासून एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहेत. शिवाय आता तर तब्बल 12 हजार पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे.