स्टंट व्हिडीओ
बब्बू शेख, नाशिक, 21 फेब्रुवारी : आजकाल प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं हटके करण्याच्या प्रयत्न युवा पिढी करताना दिसते. यामध्ये अनेक मजेशीर गोष्टीपासून ते धोकादायक स्टंटपर्यंत सर्वकाही केलं जातं. असे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक पाहिले जातात आणि अगदी कमी वेळात व्हायरल होतात. लोक असे व्हिडीओ पाहण्यास जास्त पसंती देतात. त्यामुळे तरुणांनाही असे मजेशीर, धोकादायक व्हिडीओ बनवण्यास स्फुर्ती येते. अशातच आणखी एका धोकादायक स्टंटचा व्हिडीओ समोर आला आहे. मुंबई आग्रा महामार्गांवर चाळीसगाव फाटा ते सायने दरम्यान एका तरुणाने बाईकवर जीवघेणी स्टंट बाजी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भगवान फरस उर्फ भगतसिंग असे या तरुणाचे नाव आहे. भगतसिंह मालेगावच्या टोकडे गावात राहतो. त्याची स्टंटबाजी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण गाडीवर वेगवेगळी स्टाईल मारत आहे. कधी उभा राहून तर कधी झोपून, पाय वर घेऊन गाडीवर दिसत आहे. व्हिडीओ पाहून काहीवेळासाठी हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. मोटारसायकलला दोन्ही बाजूने दुधाच्या कॅन्ड ठेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र असलेला भगवा ध्वज घेऊन या तरुणाने स्टंट बाजी केली आहे. अंगाचा थरकाप उडवून देणारी ही स्टंट बाजी असून या अगोदर देखील या तरुणाने अनेक वेळा अशी स्टंटबाजी केल्याचे बोलले जात आहे. स्टंट बाजी करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी व्हायरल झालेल्या स्टंट बाजीचा या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहे.
दरम्यान, भगसिंहच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापू्र्वीही अनेक धोकादायक स्टंटचे व्हिडीओ समोर आले आहेत. आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही.