मनमाड 03 नोव्हेंबर : वाहनांसोबत स्टंटबाजी करण्याची क्रेज आजकाल जास्तच वाढत चालली आहे. मात्र, या स्टंटबाजीच्या नादात अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. यात अनेकांचा जीव गेल्याच्या घटनाही समोर येतात. मात्र, तरीही लोक यातून धडा घेत नाहीत. आता अशीच एक घटना नाशिकमधील येवल्यातून समोर आली आहे. या घटनेत स्टंटबाजीच्या नादात युवकाने आपला जीव गमावला आहे. नगर जामखेडजवळ भीषण अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू, कुटुंबातील 3 गंभीर जखमी या घटनेत ट्रॅक्टर स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. यात ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टरखाली आल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना येवल्याच्या गवंडगाव येथे घडली. बंडू भागवत असं या तरुणाचं नाव आहे. ट्रॅक्टरवर बसून स्टंटबाजी करण्याच्या नादात ही भयानक दुर्घटना घडली आहे. ज्यात तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेत बंडू भागवत त्याच्या मित्राला ट्रॅक्टर शिकविण्यासाठी एका मैदानावर गेला होता. तिथे ट्रॅक्टर कसा चालवायचा हे तो आपल्या मित्राला दाखवत होता. यादरम्यानच गोल राउंड मारून स्टंटबाजी करण्याच्या नादात हा ट्रॅक्टर पलटी झाला. या घटनेत ट्रॅक्टरखाली आल्याने दबून बंडुचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मायलेकाला वाचवण्यासाठी RPF जवानाने चालत्या ट्रेनवर घेतली उडी शेवटी…; मुंबईतील थरारक VIDEO प्रसिद्ध व्यापाऱ्याचा अपघात - बुधवारी अपघाताची एक मोठी घटना समोर आली होती. यात अहमदनगर जामखेडचे प्रसिद्ध भांडे दुकान व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघाती निधन झाले असून तीन गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवदर्शन आवरून परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. पोखरीजवळ कार उलटल्याने हा अपघात घडला होता. यात व्यापारी महेंद्र बोरा यांचं निधन झालं.