मृत महिला आणि चिमुरडी
बब्बू शेख, प्रतिनिधी चांदवड (नाशिक), 15 एप्रिल : नवसपूर्ती करण्यासाठी आलेल्या मायलेकींचा केंद्राइ धरणात मृतदेह आढळून आले. चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील या खळबळजनक घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
नवसपूर्ती करण्यासाठी आलेल्या आईसोबत 7 महिन्याच्या चिमुकलीचा केंद्राइ धरणात बुडून मृत्यू झाला. अर्चना देवकर आणि तन्वी देवकर अशी या मायलेकीचे नाव आहे. ही घटना चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथे घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अर्चना देवकर आणि तन्वी देवकर अशी या मायलेकी इतर नातेवाईकांसोबत नवस फेडण्यासाठी आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून केंद्राई मातेच्या मंदिरात आल्या होत्या. यावेळी मंदिराला खेटून असलेल्या धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूचीं नोंद करून तपास केला सुरू आहे. तर आई आणि चिमुरडीचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहत तरुणाची आत्महत्या - स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहत तरुणाने आत्महत्या केली. सांगलीच्या जत तालुक्यातील येळवी गावातील या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. औदुंबर विजय जगताप असे आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. येळवी येथील 22 वर्षीय औदुंबर विजय जगताप याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हॉट्सअपला स्वतःचा फोटो स्टेटसला ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास जत पोलीस करत आहेत.