JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक : कांद्याचे भाव गडगडले, संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुरू केलं आंदोलन

नाशिक : कांद्याचे भाव गडगडले, संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुरू केलं आंदोलन

कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जगायचं कसं हा प्रश्न डोळ्यासमोर आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बब्बू शेख, प्रतिनिधी मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. सगळा खर्च जाऊन अक्षरश: हातात दोन आणि चार रुपये येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज चक्क लासलगावात आंदोलन केलं. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जगायचं कसं हा प्रश्न डोळ्यासमोर आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांसाठी साधं 10 रुपयांचं चॉकलेट देखील घरी घेऊन जाता येत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लिलाव बंद पाडून आंदोलन सुरु केलं.

यावेळी शेतकऱ्यांनी पायी चालत घोषणाबाजी केली आहे. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. त्यामुळे आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या व्यवहारावर मोठा परिणाम दिसून आला आहे.

‘आयुष्य संपवू द्या’, कांद्याने रडवलेल्या हतबल शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी

महाराष्ट्र आणि गुजरातमधील कांदा एकाच वेळी तयार झाला. राज्यातील कांद्याला अक्षरश: कवडीमोल भाव येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना रडवलं आहे. कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

कांद्याचे भाव कमी असल्याने अडचणीत सापडल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असून कांद्यासाठी वापरण्यात येणारी रक्कम विकल्यानंतर त्यांना वसूल करणे कठीण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या