विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक,25 एप्रिल : सध्या आंब्याचा सिजन सुरू आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. कोकण कृषी पर्यटन संस्थेतर्फे नाशिक मध्ये आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी अस्सल हापूस आंबा विक्रीसाठी नाशिकमध्ये आणला आहे. त्यामुळे नाशिककरांना कोकणातील अस्सल हापूस आंब्यांची चव चाखण्याची चांगली संधी आहे. महोत्सवास भेट द्यावी कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली रासायनिक प्रक्रिया करून वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांची विक्री केली जाते. त्यामुळे नागरिकांना कोकणातील अस्सल हापूस आंब्याची चव चाखता येत नाही आणि रासायनिक प्रक्रिया केलेला आंबा हा शरीरासाठी घातक असतो. हे लक्षात घेता नागरिकांनी या आंबा महोत्सवात भेट देऊन कोकणातील शेतकऱ्यांनी आणलेले आंबे खरेदी करून त्याची चव घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया आयोजक दत्ता भालेराव यांनी दिली आहे.
कुठे सुरु आहे हापूस आंबा महोत्सव? नाशिक शहरातील त्र्यंबक नाका परिसरातील पिनॅकल मॉल परिसरात हा आंबा महोत्सव सुरू आहे. जवळपास 600 रुपयांपासून ते 1200 रुपये डझन पर्यंत आंब्यांचे दर आहेत. या ठिकाणी फक्त अस्सल ओरिजनल हापूस आंब्याचीच विक्री केली जात आहे.
घरातील तेलाची गरज भागवण्यासाठी पिता-पुत्रांनी शोधली आयडिया, तुम्हीही घेणार का आदर्श? Videoअस्सल हापूस आंबा कसा ओळखावा? हापूस आंब्याचा कराचा भाग हा आपल्या तळ हाताच्या खड्ड्यात बसतो आणि देठाचा भाग हा मधी गेलेला असावा. हापुसला पायरी किंवा तोतापुरी सारखं खाली नाक नसतं गोल असतो. हापूस आंबा कापल्यानंतर पूर्ण केशरी रंगाचा असेल आणि हे आंबे ओरिजनल हापूस नसतात ते पिवळसर असतात केशरी नसतात. त्यामुळे हे ग्राहकांनी काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. बाजारात हापुस आंब्याच्या नावाखाली रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेल्या आंब्यांची विक्री होत आहे. त्यामुळे सर्वांनी खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे कारण रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेला आंबा आपण जर खाल्ला तर आपल्या शरीरावर देखील त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात,असं दत्ता भालेराव यांनी सांगितले.