JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gold-Silver Rate Today in Nashik : पाडव्यापूर्वी सोन्यानं गाठला उच्चांक, नाशिककरांचा खिसा होणार चांगलाच रिकामा!

Gold-Silver Rate Today in Nashik : पाडव्यापूर्वी सोन्यानं गाठला उच्चांक, नाशिककरांचा खिसा होणार चांगलाच रिकामा!

Gold-Silver Rate Today in Nashik : सण, उत्सव, समारंभ प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. आपणही सोने खरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या नाशिकमधील दर.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 21 मार्च : भारतीय लोकांना सोने चांदीचे आकर्षण असते. सण, उत्सव, समारंभ प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे दर रोजच्या रोज बदलत असतात.  नाशिक  मधील बाजारपेठेतही सोन्या चांदीच्या दरात दररोज चढउतार होत असतात. नाशिकमध्ये आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर दोन दिवसांपासून स्थिर आहेत. नाशिकमध्ये काल 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 59 हजार 810 रुपये होता. आज तोच दर हा 60 हजार रुपयांवर गेला आहे. यामुळे तोळ्या मागे 190 रुपये वाढ झाली आहे. तर काल 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 54 हजार 830 रुपये होता. आज तोच दर हा 55 हजार रुपयांवर गेला आहे. यामुळे तोळ्या मागे 170 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सोन्याचे आजचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,000 10 ग्रॅम 22 कॅरेट- 55,000 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,000 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,500 सोन्याचे कालचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 59,810 10 ग्रॅम 22 कॅरेट- 54,830 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,981 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,483

चांदीचे दर दोन दिवसांपासून स्थिर चांदीचे दर काल 68 हजार 950 रुपये किलो होते, आजही दर तेच आहेत. दोन दिवसांपासून दर स्थिर असल्यामुळे चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगली वेळ आहे. चांदीचे आजचे दर 68 हजार 950 रुपये किलो चांदीचे कालचे दर 68 हजार 950 रुपये किलो

पुढील काळात वाढ?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता लक्षात घेता,पुढील काळात सोने,चांदीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. सोने चांदीमध्ये अनेक जण गुंतवणूक करत असतात. त्यामुळे पुढील काळात भाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(टीप :  सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या