Gold Price in Nashik : नाशिकमध्ये सोन्याचे दर 'जैसे थे', संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा भाव
विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक 23 मे : महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचा काळ आहे. सर्वत्र लग्नाची धामधूम असल्यानं सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी असते. त्यासाठी सर्वांचं लक्ष रोज्या दरांवर असतं. गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीचे दर सातत्यानं वाढत आहेत. आज मात्र या दरवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी सोनं खेरदीची ही सुवर्णसंधी आहे. आज 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 61 हजार 440 रुपयेच आहे. तर 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 56 हजार 320 रुपये आहे. आजचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 61,440 10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,320 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,144 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,632
कालचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 61,440 10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,320 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,144 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,632 चांदीच्या दरात घट चांदीचे दर काल 72 हजार 860 रुपये किलो होते. आज दर 72 हजार 380 रुपये किलो वर आले आहेत. म्हणजे साधारण किलो मागे 480 रुपयांनी घट झाली आहे. चांदीचे आजचे दर 72 हजार 380 रुपये किलो चांदीचे कालचे दर 72 हजार 860 रुपये किलो Nashik Weather Update : उष्णतेनं नाशिककर हैराण, आज दिलासा मिळणार की वाढ होणार? सोन्यात गुंतवणुकीची संधी भारतीयांना सोन्या-चांदीचं आकर्षण आहे. त्यासोबतच सोन्याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. गेल्या तीन महिन्यात सोन्याचे दर जवळपास 10 हजारांनी वाढले आहेत. पुढेही दर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनं खेरदीची ही योग्य वेळ असल्याचं जाणकारांचं मत आहे. (टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)