विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक 24 फेब्रुवारी : आदिवासी भागात नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील तरूणंना सुविधांचा अभाव असल्यानं त्याचा वापर बदलत्या जगात कसा करावा याची फारशी माहिती नसते. त्यांना ही माहिती देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील करंजाली पेठमध्ये विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पतीसह सुविधा केंद्र पुणे आणि राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालय भारत सरकार विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यांना मोलाचे प्रशिक्षण सह्याद्री शिक्षण मंडळ दिंडोरी संचलित एमजीएम कला वाणिज्य विज्ञान महाविद्याल वनस्पतीशास्त्र विभाग, करंजाली, पेठ या ठिकाणी कार्यशाळा पार पडली,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र प्रमुख डॉक्टर दिगंबर मोकाट,अमृत फूड प्रायव्हेट लिमिटेड पुणे याचे संचालक साहेबराव मेंगडे पाटील यांनी मार्गदर्शन केले. एकाच ठिकाणी मिळतात 600 पेक्षा जास्त पान, एकाची तर आहे तब्बल दीड लाख किंमत! Video या भागात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती असतात, काही आदिवासी बांधवांना देखील या वनस्पतींची माहिती असते मात्र त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना या संदर्भात जास्तीत जास्त माहिती देऊन, त्या वनस्पतींचा उपयोग कसा करता येईल तसेच त्यातून विद्यार्थ्यांना फायदा कसा मिळेल, भविष्यात ते या वनस्पतींवर प्रक्रिया करून अजून चांगलं काम करू शकतात, प्रतिक्रिया प्रो.डॉ दिगंबर मोकाट यांनी यावेळी दिली. वर्धा रेल्वे स्टेशन होणार चकाचक, 150 कोटींमध्ये मिळणार ‘या’ सुविधा या कार्यशाळेमध्ये दिगंबर मोकाट यांनी विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती जतन संवर्धन आणि लागवड याबद्दल मार्गदर्शन केले तसेच एक चांगला उद्योजकाचा प्रवास कसा होऊ शकतो याबद्दल महत्त्वाच्या टिप्स दिल्या. या कार्यशाळेसाठी जवळपास 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .