नागपूर, 12 जुलै: सध्याच्या काळात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहोचवतो. त्यासाठी पर्याय म्हणून अलिकडे कागदी पिशव्यांचा वापर वाढत आहे. आज जागतिक पेपर बॅग दिवस साजरा होत असताना तसा संकल्प करण्याची गरज आहे. नागपुरातील साधना फडकर यांनी याबाबत सर्वांपुढे एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. रद्दीतील कागदापासून आणि टाकाऊ वस्तूंपासून त्या सुंदर कलाकृती तयार करत आहेत. त्यांच्या या कलाकृती अनेकांना भूरळ घालत आहेत. कल्पकतेतून रद्दीच्या अप्रतिम कलाकृती दररोज येणारे वृत्तपत्र एकदा वाचून झाले की दुसऱ्या दिवशी त्याची रद्दी होते. तसेच घरगुती वापरातील अनेक वस्तू निरूपयोगी झाल्या की कचऱ्यात टाकून दिल्या जातात. मात्र, सौंदर्यदृष्टी आणि कल्पकता असेल तर त्यापासून सुंदर कलाकृती साकारू शकतात. नागपुरातील साधना फडकर यांनी तसा प्रयोग केला आहे. त्यांनी घरातील निरूपयोगी वस्तूंचा वापर करून अप्रतिम कलाकृती साकारल्या आहेत.
नोकरी सांभाळत जपला छंद साधना फडकर यांना रद्दीतील कागदाचा पुनर्वापर करण्याची कल्पना सुचली. आपली नोकरी सांभाळत असतानाच त्यांना कागदापासून वस्तू निर्मितीचा छंद लागला. रद्दितील पेपर, कागदी पुठ्ठा, रंग, चिक्की, इत्यादी गोष्टींचा वापर करत, कागदापासून हॅन्डबॅग, फुलदाणी, कागदी पिशव्या, विविध पॉट, टेबल लॅम्प अश्या अनेक वस्तू त्यांनी तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे फार कमी खर्चात, अतिशय सुंदर आणि टाकाऊ मधून टिकाऊ अश्या या वस्तू आहेत. 2014 पासूनचा कलात्मक प्रवास साधना या एका ख्यातनाम रुग्णालयात कार्यरत आहेत. आपला छंद आणि विरंगुळा म्हणून त्या कला देखील जोपासत आहे. गेल्या 2014 साला पासून त्यांनी या कलात्मक प्रवासाला सुरुवात केली. मोबाईलवर या संबंधित विविध व्हिडिओ आणि फोटोज् बघून त्यांनी त्यात आपली कल्पकता वापरली. आता नोकरीतून निवृत्त झाले की पूर्णवेळ या कामाला देणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना अश्या टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक छंद जोपासायची आवड निर्माण व्हावी. तसेच महिलांनी प्रशिक्षण देऊन त्यातून त्यांना अर्थांजन मिळावे व एक मोठा रोजगार अनेकांच्या हाताला मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे साधना सांगतात. नारळ पाणी पिऊन केला सराव, डोंबिवलीच्या इशाचा इंडोनेशियात सिल्व्हर पंच! मिनीचर गार्डन फायद्याचे घरात आपण बऱ्याच गोष्टी निरुपयोगी म्हणून टाकून देतो. मात्र त्यातून देखील काही भन्नाट निर्माण केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, वाईन बॉटल, कॉफी जार, कप, तुटलेल्या कुंड्या, रिकामे बॉक्स, मेटल डब्बे, इत्यादी साहित्य त्यावर आर्टिफिशियल क्ले, रंग वापरून वेग वेगळे कलाकृती साकारली जाऊ शकते. या शिवाय घरातील गार्डन मध्ये मिनीचर गार्डन देखील तयार केले जाऊ शकतात. कॅलिफोर्निया सारख्या देशात मिनीचर गार्डनिंग हे फार मोठे असोसिएशन आहे, असे फडकर सांगतात. तीन R महत्त्वाचे मिनीचर गार्डनिंगद्वारे कमी जागेत, कमी मेंटेनन्स आणि कमी खर्चात उत्तम गार्डनिंग केले जाऊ शकते. शिवाय ते दिसायला देखील सुंदर दिसते. बरेचदा आपण गिफ्ट देताना फुलांचा बुके देत असतो. मात्र त्याऐवजी या मिनिचर गार्डन दिल्यास ते बुके जास्त टिकणारे आणि दिसायला सुंदर दिसेल असे मला वाटते. मी कायम तीन R लक्ष्यात घेऊन काम करते ते म्हणजे रि-सायकल, रि-युज आणि रिडुस अशी भावना साधना फडकर यांनी बोलताना व्यक्त केली.