samruddhi mahamarg
हरीष दिमोटे, शिर्डी, 09 जून : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यावर अपघातांची संख्या वाढली होती. अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती वेळोवेळी केली जात आहे. दरम्यान, आता समृद्धी महामार्गावर टायर आजपासून टायर तपासणी करूनच वाहने सोडली जाणार आहेत. यासाठी शिर्डी इंटरचेंजवर वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन झाले आहे. टायर खराब असल्यास समृद्धी महामार्गावर प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली. समृध्दी महामार्गावर प्रवास करायचा असेल तर आता वाहनांचे टायर चांगले असण्याची गरज आहे. समृध्दी महामार्गावर वाढते अपघात रोखण्यासाठी परीवहन विभागामार्फत आजपासून गाड्यांच्या टायरची तपासणी केली जाणार आहे. जर गाडीचे टायर खराब असतील तर तुम्हाला समृध्दीवर प्रवेश दिला जाणार नाही. शिर्डीच्या इंटरचेंजवर आज परीवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते तपासणी केंद्राचे उद्घाटन झाले. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, काही घडल्यास राज्याचे, देशाचे गृहमंत्री जबाबदार : सुळे टायर तपासणी केंद्रावर वाहनांची तपासणी मोफत होणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त वाहन चालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. सध्या शिर्डी व नागपूर या दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्रांची उभारणी केली गेली आहे. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर आणि दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर असा सुरू झाला आहे. दरम्यान, महामार्ग वाहतुकीला खुला केल्यानतंर अनेक अपघातांमध्ये वाहनांचे टायर फुटल्याचं समोर आलंय. त्यामुळे असे अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या टायर तपासणी केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला गेला. टायर तपासणी केंद्रावर नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पीन चेक आणि रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती, टायर वेअर चेक इत्यादी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.