JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुमच्याकडे आहे भारी आयडिया,पेटंट करून जिंकू शकता 5 लाख, असं आहे फेस्टिवल?

तुमच्याकडे आहे भारी आयडिया,पेटंट करून जिंकू शकता 5 लाख, असं आहे फेस्टिवल?

सर्जनशील कल्पनांना बळ देण्यासाठी विजन नेक्स्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने नागपूर शहरात पहिल्यांदाच पेटंट फेस्टिवल होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 25 जुलै : भारत हा तरुणाईचा देश आहे. त्यामुळे आपल्या देशात सर्जनशीलता, कल्पकता आणि नाविन्यता इत्यादींची भरमार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आज नव नवीन संशोधन करत तरुणाई विकासाची कास धरू पहाते आहे. अश्याच सर्जनशील कल्पनांना बळ देण्यासाठी विजन नेक्स्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने नागपूर शहरात पहिल्यांदाच पेटंट फेस्टिवल होणार आहे. यामध्ये सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होऊन लाखो रुपयांची बक्षिसे यात जिंकता येणार आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवात शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य अधिष्ठाता हे देखील सहभागी होणार आहेत. काय आहे उद्देश?  नागपूरात शहरात पहिल्यांदाच अश्या प्रकारचा पेटंट फेस्टिवल होणार आहे. नवनवीन कल्पनांना चालना मिळावी हा या मागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांसह कल्पनांच्या या महाकुंभात शहरातील महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकांना देखील यात सहभागी होता येणार आहे. शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच या संदर्भातील झालेल्या बैठकीमध्ये हिरीरीने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.

असा आहे पेटंट फेस्टिवल पेटंट फेस्टिवल ही कल्पक आणि सर्जनशील तरुणाईसाठीची संधी आहे. तरुणांनी देशहिताच्या, समाजहिताच्या अथवा त्यांचा काही तरी उपयोग होऊ शकतो, कुणाला तरी कामी येऊ शकतात अशा कल्पना व्हिजन नेक्स्टकडे पाठवायच्या आहे. संशोधन पेटंटच्या मार्गावर आहे, किंवा पेटंट मिळाले आहेत ते सुध्दा आपली कल्पना पाठवू शकतात. व्हिजन नेक्स्ट त्यांच्याकडे आलेल्या कल्पना आम्ही तज्ज्ञांकडे पाठवणार आहे. ज्यांच्या कल्पना आहेत त्यांना आणि ती कल्पना ज्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना एकमेकांशी बोलण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आलेल्या कल्पनापैकी निवडक कल्पनांना पाच लाख रुपयांचे  बक्षीसे सुध्दा देण्यात येणार असल्याचे व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी सांगितले.

Business Ideas: गावात स्वस्तात सुरु होतील हे बिझनेस, रिकाम्या जागेचा वापर करुन करा भरघोस कमाई

संबंधित बातम्या

कल्पना पेटंटच्या दर्जाची असेल तर तसे मार्गदर्शनही मिळेल. सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र मिळेल. ज्या कॉलेजमधून सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतील अशा पाच कॉलेजचा सन्मान होईल. या संदर्भातील जनजागृती मोहीम सुरू झाली असून आणि नागपुरातील 100+ शैक्षणिक परिसरांमध्ये ती राबविली जाणार आहे. इथे करता येईल नोंदणी ज्यांच्याकडे सर्जनशील कल्पना आहेत, ज्यामुळे देशाचे, शहराचे कल्याण होऊ शकते असे आपणास वाटते, अशी कल्पना www.patentfest.com या वेबसाइटवर 5 ऑगस्टपर्यंत नोंदविता येईल. चांगल्या कल्पना नोंदविणाऱ्यांना 8 आणि 10 ऑगस्ट रोजी सादरीकरणाची संधी दिली जाईल. अंतिम स्पर्धा 14 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्या कॉलेजमधून सर्वाधिक कल्पना येतील, अशा पाच कॉलेजेसना बक्षिसे दिली जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या