JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुसळधार पाऊस अन् पाण्याचा पडला वेढा, तान्हुल्या बाळासह 16 जण रात्रभर जीव मुठीत घेऊन बसले, अखेर..Video

मुसळधार पाऊस अन् पाण्याचा पडला वेढा, तान्हुल्या बाळासह 16 जण रात्रभर जीव मुठीत घेऊन बसले, अखेर..Video

नागपूर शहराला बुधवारी रात्री दमदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसाचा फटका शहरातील अनेक सखोल भागात राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर 27 जुलै : नागपूर शहराला बुधवारी रात्री दमदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.  नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार गेल्या 24 तासात 164 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील अनेक ठिकानातील रस्त्यांना अक्षरशः नद्या, नाल्याचे रुप प्राप्त झाले होते. शहरातील अनेक सखोल भागत पाण्याने विळखा घातला असून काही भगत पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा फटका शहरातील अनेक सखोल भागात राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. नागपुरातील उमरेड रोड कळमना येथे हरडे फार्म हाऊस परिसर येथे राहणाऱ्या धवनगये या कुटुंबाला रात्र जीव मुठीत घेऊनच काढावी लागली. या कुटुंबातील आई वडील त्यांच्या दोन लहान मुलीसह एक श्वान या पावसाने पाण्याच्या विळख्यात सापडले होते. मात्र सकाळी पावसाने उसंत दिल्यानंतर एसडीआरएफच्या टीमने बोटींचा वापर करत विशेष प्रयत्नाने पाण्यात अडकलेल्या या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना सुखरूप स्थळी पोहचवले आहे. तर  नागपुर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात येणाऱ्या एका वीट भट्टीवर अडकलेल्या 16 जणांचं एसडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. विशेष बाब म्हणजे त्यात एका चिमुकल्या बाळाचाही समावेश होता.

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 164 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू 29 वर्षात पहिल्यांदाच नागपूर शहर किंवा जिल्ह्यात आठ तासांत एवढा पाऊस पडला आहे. यापूर्वी 1994 मध्ये जुलै महिन्यात 303 मिली मीटर पाऊस पडला होता. यापूर्वी 1994 मध्ये जुलै महिन्यात 303 मिली मीटर पाऊस पडला होता. शहरातील अनेक हाय सोसायट्यांमध्ये साचले पाणी शहरातील सखल भागात तसेच पॉश भागात पाणी साचल्याचे दिसून आले. अनेक अपार्टमेंट पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. पडोळे चौक, शंकर नगर, मंगलमूर्ती चौकात गुडघाभर पाणी साचले होते. रस्त्याचे तलावात रुपांतर झाले. त्याचवेळी आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पाऊस थांबल्यानंतर अग्निशमन विभाग साचलेले पाणी काढण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर अनेकांकडून डिझेल पंपाच्या साहाय्याने पाणी बाहेर फेकले जात आहे.

Kalyan-Dombivli Rain : कल्याण-डोंबिवलीमध्ये तुफान पाऊस, रेल्वे ट्रॅक गेला पाण्याखाली, चाकरमानी लटकले VIDEO

संबंधित बातम्या

या भागातील घरांमध्ये पाणी शिरले नागपूर शहरातील वर्धमान नगर, शांती नगर, पारडी, भरतवाडा, शिवशंभू नगर, मनीष नगर, नरेंद्र नगर, सूर्या नगर, एच.बी. शहर इत्यादी भागांना पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्याच्या काही भागात तीव्र आणि मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यतेसह आजचा ऑरेंज अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या