नागपूरमध्ये दोन तरुण व्यापाऱ्यांचा खून
नागपूर, 27 जुलै : नागपूरमध्ये दोन तरुण व्यापाऱ्यांचं अपहरण करून हत्या केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. उधारीच्या पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोघांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले होते. ते बाहेर काढण्यात आले असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागपूरमधील दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर दोन्ही व्यापारी बेपत्ता असल्याची तक्रार बर्डी आणि सोनेगाव पोलीसात देण्यात आली होती. यानंतर दोन्ही व्यापाऱ्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले. दोघांचाही गोळी झाडून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील तळेगाव इथं नदी पात्रातून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. Ankit Murder Case : बॉयफ्रेंडला कोब्राच्या ताब्यात देणाऱ्या माहीचं नव रुप समोर, मोलकरणीसोबत… सट्ट्याची उधारी आणि नंतर उधारी देणं शक्य नसल्याच्या कारणावरून ही हत्या झाली आहे. दोन तरुण व्यापाऱ्यांच्या हत्येमुळे नागपूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
राज्यात मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे. अनेक ग्रामीण भागांमध्ये दरड कोसळून किंवा रस्त्याला भेगा पडल्याने गावांच्या संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी आपल्याने पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी जावं लागत आहे. आजरा तालुक्यातील किणे गावात मुसळधार पावसानं दुर्घटना घडली आहे. पै पै जमा करुन जे घर उभं केलं, भिंती सजवल्या त्याच घरानं महिलेचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहत्या घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्देवी घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे, तर गुडूळकर कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे.