JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chandrapur News : आता उलगडणार 20 कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास, विदर्भाच्या जमिनीत सापडला मोठा खजिना! Video

Chandrapur News : आता उलगडणार 20 कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास, विदर्भाच्या जमिनीत सापडला मोठा खजिना! Video

चंद्रपूरजवळ 20 कोटी वर्षांहून जुना खजिना सापडला आहे. पाहा काय आहे हा खजिना…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल देवकर, प्रतिनीधी नागपूर, 31 मे :  वेगवेगळ्या खनिजानं संपन्न असलेल्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भूगर्भात मोठा खजिना दडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यात सुमारे 20 कोटींहून अधिक वर्षांच्या दरम्यानच्या काळातील ग्लासोप्टेरिस (Glassopteris) ह्या प्रजातीच्या वनस्पतींच्या पानांची जीवाश्म सापडली आहेत. त्यामुळे या विषयातील संशोधनाला नवी चालना मिळणार असून अनेक महत्त्वाची रहस्यं उघड होणार आहेत. काय आहे ठेवा? भद्रावती ते चंदनखेडा मार्गावर शेती आणि जंगलात काही ठिकाणी ही अतिप्राचीन पुरावे सापडली आहेत. पर्यावरण आणि जीवाश्म संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी हा ठेवा शोधून काढलाय. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील भूगर्भात दडलेली  डायनोसॉर,हत्ती,स्ट्रोमॅटोलाईट,शंख शिंपले , तसंच झाडांची आणि पानांची जिवाश्म शोधून काढली आहेत. आता तब्बल 20 कोटी वर्षांहून जुन्या जुरासिक काळातील जिवाश्म आढळल्यानं त्या काळातील इतिहासाची माहिती आपल्याला मिळणार आहे.

‘चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या परिसरात असंख्य खनिजसाठा आहे. चंद्रपूरच्या परिसरात जिवाष्मे असल्याची भूशास्त्र विभागाची नोंद होती परंतू चांगली जीवाश्म मिळाली नव्हती. गेल्या काही वर्षापासून या परिसरात माझं संशोधन सुरू होतं. भद्रावती-चंदनखेडा या मार्गावरील शेती आणि जंगलात काही ठिकाणी हे पुरावे सापडले आहेत,’ अशी माहिती प्रा. चोपणे यांनी दिली. ‘चंद्रपूर जिल्हा हा भूशास्त्रीय दृष्ट्या एक संग्रहालय असून येथे 300 ते 6 कोटी वर्षे जुने बहुतेक प्रकारची खडक आढळतात. तर 25 कोटी ते 25 हजार वर्षे प्राचीन जीवाश्मे आढळतात. 20 कोटी वर्षांपूर्वी ही झाडं जिवंत होती. त्यावेळी पृथ्वीवर डायनासॉरचं अस्तित्व होतं. तो घरोघरी जातो,शिल्लक अन्न गोळा करतो; पुढे जे घडतं ते पाहून तुम्ही सॅल्युट कराल पृथ्वीवर तेव्हा पांजिया हा एकच खंड होता. भारताचा भूप्रदेश आजच्या ऑस्ट्रेलियाला लागून होता. प्राचीन भारताच्या आणि चीनच्यामध्ये टेथीस हा समुद्र होता. त्यानंतर कोट्यवधी वर्षांनी भारतीय भूखंड उत्तरेला सरकला. त्याची चीनच्या भूखंडला टक्कर दिली. त्यामधून हिमालय पर्वताची निर्मिती झाली. अजूनही भूकवचाची गती उत्तरेकडं सरकत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील भूगर्भात अजून असे अनेक रहस्य दडलेली असून भूशास्त्र विभागाने आणि संशोधकानी सविस्तर संशोधन केल्यास भविष्यात त्याचे गुपीत उलगडेल, असा विश्वास प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या