JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सीताराम कुंटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट, पोलीस बदल्यांबाबत एसआयडीच्या अहवालाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पण...

सीताराम कुंटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट, पोलीस बदल्यांबाबत एसआयडीच्या अहवालाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पण...

महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीत भ्रष्टाचार आणि लॉबिंग झाल्याचा आरोप करण्यात येत होता. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 फेब्रुवारी: राज्यातील पोलीस दलातील (Maharashtra Police) अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या (Police officer transfer) संदर्भात लॉबिंग आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला दिलेल्या जबाबात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होत होता. या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीतील गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात तत्कालीन एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी जुलै 2020 मध्ये एक अहवाल तयार केला होता. त्या प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे हा अहवाल दिला होता. या अहवालानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 28 सप्टेंबर रोजी डीजीपी सुबोध जैसवाल यांना एक पत्र पाठवले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या या पत्रावर डीजीपी सुबोध जैसवाल यांनी उत्तरच दिलं नाही असा जबाब सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिलं आहे. वाचा :  परमबीर सिंगांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर आरोप, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवल्या चार दिवसांपूर्वी असं वृत्त समोर आलं होतं की, सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर एक गौप्यस्फोट केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर एक मोठा आणि धक्कादायक गौप्यस्फोट केला असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबानुसार, सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं की अनिल देशमुख गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. मी त्यांच्या अधीन काम करत होतो आणि त्यामुळे त्या याद्या स्वीकारायला मी नकार देऊ शकत नव्हतो. सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीचा अनिल देशमुखांवर दबाव मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीने परमबीर सिंग यांना निलंबित एपीआय सचिन वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करण्याबाबत आपली भूमिका काय होती? असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना सिंग यांनी धक्कादायक दावा केला आहे. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तशा सूचना होत्या, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या