JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मुख्यमंत्री राज ठाकरे..'; एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीनंतर मनसेच्या नेत्याचं ते ट्विट चर्चेत

'मुख्यमंत्री राज ठाकरे..'; एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीनंतर मनसेच्या नेत्याचं ते ट्विट चर्चेत

मनोज चव्हाण यांनी राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पाहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं की ‘मुख्यमंत्री राज ठाकरे म्हणून पाहायला संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल’.

जाहिरात

फाईल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 16 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी राज ठाकरेंचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोचं कॅप्शन लक्ष वेधणारं आहे. पुण्याच्या प्रश्नासाठी राज ठाकरे थेट पोहोचले ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण आलं समोर या फोटोमध्ये राज ठाकरे ज्या खुर्चीवर बसलेले आहेत, तिथे त्यांच्या पाठीमागेच मुख्यमंत्री असं लिहिलेली पाटी आहे. हाच फोटो ट्विट करत मनोज चव्हाण यांनी राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पाहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं की ‘मुख्यमंत्री राज ठाकरे म्हणून पाहायला संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल’.

संबंधित बातम्या

राज ठाकरे यांचा हा फोटो शेअर करत त्यांनी फोटोवरही मजकूर लिहिला आहे. यात म्हटलं आहे ‘संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सैनिकांचं स्वप्न’. ‘वर्षा’वर हालचालींना वेग, राज ठाकरेंनंतर काँग्रेसचे तीन बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण - दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी घडतंय हे स्पष्ट झालंय. पण या भेटीमागे नेमकं कारण काय होतं ते मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्ट करण्यात आलं. राज ठाकरे यांनी पुण्यातील करवाढीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं होतं. तसेच आरोग्य संबंधित योजना अतिशय कमी दरात उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी केली होती. याच मुद्द्यासाठी राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या