प्रतिकात्मक फोटो
मुंबई 24 जुलै : रवींद्र कुमार सैनी यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. राष्ट्रीय स्तरावरील रेल्वे स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या या बॉक्सिंगपटूला पनवेल-रोहा निर्जन मार्गावर रेल्वे रुळावर एक दमलेलं मूल दिसलं. या मुलाला आधार देण्याचं सैनी यांनी ठरवलं. मध्य रेल्वेमध्ये लोकोमोटिव्ह पायलट म्हणून कार्यरत असलेल्या सैनींने 12 वर्षांच्या हरवलेल्या मुलाला फक्त अन्न आणि निवारा दिला नाही तर एकाच दिवसात त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करून त्यांना संपर्कही साधला. हा मुलगा उत्तर प्रदेशातील असून तो अनाथ आहे आणि तो आपल्या काकूसोबत पनवेलला गेला होता. मात्र, इथेच त्यांची ताटातूट झाली आणि तो हरवला, असं चौकशीत समोर आलं. 11 जुलै रोजी सैनी सोमाटणे येथे ट्रेनमधून सामान उतरवत असताना त्यांना प्रथम एक मुलगा पॉइंट्समनला दिशा विचारत असल्याचं दिसलं. सैनी म्हणाले “अंधार पडत होता आणि मला मुलाच्या सुरक्षेची काळजी वाटत होती. मात्र मी कामावरून मध्येच निघू शकत नव्हतो म्हणून मी त्या मुलाला माझ्या लोकोमोटिव्हमध्ये बसवलं आणि माझा डबा त्याला जेवण्यासाठी दिला. तो थकला होता आणि काही वेळातच तो झोपून गेला.” …अन् चक्क पोलिसांनीच पळवला गुटखा; सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 2 कर्मचारी निलंबित सैनीची ड्युटी संपली तेव्हा मध्यरात्र झाली होती आणि त्यांनी मुलाला उठवले जेणेकरून ते तिथून निघू शकतील. त्यांनी मुलाला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारण्यास सुरुवात केली. त्याला आई-वडील नसून तो बुधेडा येथे आजी-आजोबांसोबत राहत असल्याचे मुलाने सांगितले. त्याला त्यांचा पत्ता किंवा फोन नंबर माहीत नव्हता. “त्याने त्याच्या शाळेचे नाव देखील सांगितले, परंतु Google वर सर्च करूनही याबद्दलची काहीही माहिती मिळत नव्हती, असं सैनी यांनी सांगितलं. यानंतर लोको पायलटने मुलाला आपल्या घरी नेण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तो फ्रेश होऊ शकेल. ते दोघंही सैनी यांच्या सायन येथील निवासस्थानी पोहोचले तेव्हा पहाट झाली होती. हा मुलगा सैनी यांना दिसण्याआधी जवळपास एक दिवस रेल्वे रुळावर असहाय्यपणे चालत होता. “सैनी यांनी सांगितलं की या मुलाने आपलं आधार कार्डही घरी असल्याचं सांगितलं. त्यामुळे मी त्याला आधार नोंदणी केंद्रावर नेण्याचा आणि मदत घेण्याचा विचार केला,” दरम्यान, सैनींने हा मुलगा सापडल्याचा एक व्हॉट्सअॅप मेसेज टाईप केला आणि त्याच्या पार्श्वभूमीच्या तपशीलांसह लोको पायलटच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला. काही तासांतच हा मेसेज व्हायरल झाला आणि सैनींला फोन येऊ लागले. लोक या मुलाला पुन्हा त्याच्या घरी उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याच्या ऑफर देत होते. मात्र, या मुलाला कोणासोबतही पाठवले सैनींना पटलं नाही. अखेर या मुलाच्या गावातील एक रहिवासी त्याला घेण्यासाठीसाठी सैनी आणि या मुलाने त्याच्या आजोबांसोबत व्हिडिओ कॉलवर याबद्दल पूर्ण माहिती घेतली आणि यानंतरच त्याला या व्यक्तीसोबत पाठवण्यात आलं’ वडिलांनी दिलं केकचं आश्वासन, पण पैसे न दिल्याच्या रागातून पदवीच्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल मुलाच्या आजी-आजोबांना मुंबईला येण्यास सांगितले होते, पण ते इतके गरीब होते की रेल्वेचे तिकीट काढण्याचे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बऱ्याच प्रयत्नांनतर त्याचे काका त्याला घेण्यासाठी आले. त्यांची ओळख पटवून आणि पूर्ण खात्री करून या मुलाला त्यांच्यासोबत आपल्या घरी पाठवण्यात आलं.