JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivneri Bus: शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त, आता तिकीटासाठी 'इतके' पैसै कमी मोजा

Shivneri Bus: शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त, आता तिकीटासाठी 'इतके' पैसै कमी मोजा

राज्यभरातील हजारो लोक रोज बसने प्रवास करतात. यामध्ये मुंबई-पुणे रस्त्यांवर धावणारी एसटी महामंडळाची ‘शिवनेरी’ बस अधिक लोकप्रिय आहे.

जाहिरात

शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै : राज्यभरातील हजारो लोक रोज बसने प्रवास करतात. यामध्ये मुंबई-पुणे रस्त्यांवर धावणारी एसटी महामंडळाची ‘शिवनेरी’ बस अधिक लोकप्रिय आहे. अनेक प्रवासी पुणे, मुंबईचा प्रवास ‘शिवनेरी’नेच करतात. या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. आता मुंबई पुणे शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. त्यांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे. आता लवकरच ‘ई-शिवनेरी’ ने तुम्हाला प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाने हा मोठा निर्णय घेतला असून तब्बल 100 ई-शिवनेरी महाराष्ट्रातील विविध रस्त्यांवर धावणार आहेत. जन-शिवनेरी या नावाने या बसेस धावणार असून लोकांचा प्रवास अजून आरामदायी होणार आहे. Live News Updates : टोमॅटोची टंचाई, दरवाढ टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय सध्याच्या तिकीट दराच्या तुलनेत या नव्या सुरु होणाऱ्या बसचा तिकीट दर कमी असेल. शिवनेरी बसचा दरही कमी होणार आहे. डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा खर्च कमी असल्यामुळे या ई बसचा दरही कमी होणार आहे. बसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, नव्या ई-शिवनेरी बसमध्ये बऱ्याच सुविधा असणार आहेत ज्यामुळे प्रवाशांना प्रवासात अडचण येणार नाही. प्रवाशांसाठी आरामदायी खुर्च्या, मोबाईल चार्जिंगसाठी जागा, बॅग ठेवण्यासाठी जागा. त्यामुळे आता शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या