मालेगाव, 9 फेब्रुवारी : मालेगाव शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पती, पत्नी आणि लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक वाहन घेऊन फरार झाला. अपघाताची मिळताच परिसरातील संतप्त नागरिकांनी माजी आमदार यांच्या नेतृत्वाखालील मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी केली. रस्तारोको करण्यात आल्याची माहिती मिळताच तहसीलदार, पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढत चाळीसगाव फाटा परिसरात अपघात होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. हेही वाचा - पुण्यामध्ये सावत्र भावावर केला कुऱ्हाडीने हल्ला, कबुतरांवरून झाला होता वाद प्रशासनाच्या आश्वासनानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. या रस्तारोकोमुळे सुमारे दीड तासापासून ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरू झाली. दरम्यान, अपघातात मयत झालेल्यांची माहिती मिळाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगण्यात आलं असून मयत हे चाळीसगाव तालुक्यातील शिरूड येथील असल्याचे समोर आलं आहे. त्यांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क केल्यानंतर ते मालेगावकडे निघाले असल्याचे पोलिसांनी सूत्रांनी सांगितले. फरार झालेल्या चालकाचाही पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.