JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिवसभर शेतात काम केलं अन् संध्याकाळी गेला जीव; जळगावात उष्माघाताचा आणखी एक बळी

दिवसभर शेतात काम केलं अन् संध्याकाळी गेला जीव; जळगावात उष्माघाताचा आणखी एक बळी

राज्यात प्रचंड उष्णता वाढली असून यामुळे उष्माघाताने आणखी एक बळी गेला आहे. जळगाव जिल्ह्यात एका उपसरपंचाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

जळगावात उष्माघाताचा आणखी एक बळी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 20 मे : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत चालला आहे. परिणामी उष्माघाताचे बळी वाढत आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा येथील उपसरपंच तथा माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन कमलाकर आत्माराम पाटील यांचा उष्माघाताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. उष्माघाताचा आणखी एक बळी कमलाकर पाटील यांचे वावडदा शिवारात शेत आहे. रात्री बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतातील कामे दिवसा करावी लागतात. या अनुषंगाने कमलाकर पाटील आणि त्यांच्या घरातील महिला यांनी दिवसभर काम केले. प्रचंड उन्हामुळे सायंकाळी त्रास व्हायला लागला. सुरुवातीला त्यांना लिंबू पाणी देऊन उपचार केले. त्यानंतर त्यांना जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. कमलाकर पाटील हे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत उपसरपंच होते. गावासाठी व ग्रामस्थासाठी ते मदत करायचे. याआधी उखळु विक्रम जाधव यांचा मुत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी वावडदा येथील उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील याचा मुत्यू झाला. दरम्यान शासनाकडून कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे. गावातील उपसरपंच यांचा मृत्यू झाल्याने शनिवारी गावातील सर्व दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.

उष्माघाताने राज्यात 4 जणांचा मृत्यू उष्माघाताने राज्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील हिमायतनगर येथील एकाचा व पैठणमधील आडूळ बु. येथील तातेराव वाघ यांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील राहुरी येथील शेतकरी साहेबराव आव्हाड आणि अकोल्यात ट्रकचालक अकबर शहा मेहबूब शहा यांचा मालेगाव येथे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हात बाहेर जाऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे.

का आली उष्णतेची लाट बंगालच्या उपसागरात बदल होत आहे. याठिकाणी मोचा वादळ सक्रीय झाले आहे. त्यामुळे अवकाळी पडणारा पाऊस जाऊन राज्यातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या