मुंबई, 30 ऑक्टोबर: भाजपा-शिवसेना एकत्रित सत्ता स्थापनेचा दावा करतील. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला लवकरच निश्चित होईल. 5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री राहिल ही भूमिका मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली. तीच आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. भाजप-सेनेनं एकमेकांना कुठला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे त्यावर भाष्य करणं मात्र गिरीश महाजन यांनी टाळलं आहे.