JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिलासा! कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त; पाहा CORONA TEST चे नवे दर

दिलासा! कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त; पाहा CORONA TEST चे नवे दर

सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात कोरोना चाचणी (CORONA TEST) उपलब्ध झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 डिसेंबर : राज्यातील नागरिकांसाठी दिलादायक बातमी आहे. राज्य सरकारने कोरोना चाचणीचे (corona test) दर आता आणखी कमी केले आहेत. कोरोना टेस्टची किंमत जवळपास 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्य़ात म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोनाची चाचणी फक्त 700 रुपयांमध्ये करता येणार आहे. कोणत्याही खासगी प्रयोगशाळेत चाचणी केल्यास आता इतकेच दर द्यावे लागतील. सुरुवातीला कोरोना चाचणीसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जायचे. अगदी सुरुवातीला खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे 5200 रुपये आकारले जात होते. नंतर त्यावर सरकारने नियंत्रण आणलं. राज्य सरकारने हे दर कमी केले. सप्टेंबर महिन्यात 980 रुपये त्यानंतर आता 700 रुपये दर करण्यात आले आहेत. हे वाचा -  सर्वात आधी सामान्यांना नाही तर आमदार-खासदार, VVIP ना मिळणार कोरोना लस? राज्यात कोरोना रुग्णांचा घसरत असलेला आलेख सध्या कायम आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 442 नवे रुग्ण आढळून आलेत. तर  70 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 18 लाख 86 हजार 807 झाली आहे. त्या पैकी 17 लाख 66 हजार जण बरे झाले. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून राज्यात सध्या 71 हजार 356 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतली 403 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात  4 हजार 395   रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही 17  लाख 66  हजार 10  झाली आहे. राज्यांचा Recovery Rate 93.60 म्हणजेच 94 टक्क्यांच्या जवळ गेला असून हा उच्चांकी दर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या