JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / केजरीवालांच्या दिल्लीत नव्हे, महाराष्ट्राच्या मुंबईतच आहे Corona चा वाढता धोका; ही आहेत कारणं

केजरीवालांच्या दिल्लीत नव्हे, महाराष्ट्राच्या मुंबईतच आहे Corona चा वाढता धोका; ही आहेत कारणं

ICMR च्या सूत्रांनुसार ,महाराष्ट्रात Covid-19 ची चाचणी झालेल्या प्रत्येक 100 माणसांपैकी 31 हून अधिक पॉझिटिव्ह सापडत आहेत. ही आकडेवारी भयावह आहे.

जाहिरात

सध्या कझाकस्तानमध्ये 50 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 264 लोकांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

स्नेहा मुंबई, 22 जून : महाराष्ट्रात चाचण्या अधिक होतात, म्हणून Coronavirus चे रुग्ण अधिक सापडतात, असा दावा केला जात होता. पण आता Covid चाचणी पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण महाराष्ट्रातच सर्वाधिक असल्याचं उघड झालं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक Coronavirus चे रुग्ण आहेत, हे तर माहीत होतंच पण आता आणखी एक गंभीर बाब उघड झाली आहे. ICMR च्या सूत्रांनुसार COVID-19 ची चाचणी पॉझिटिव्ह यायचं प्रमाणही सर्वात जास्त महाराष्ट्रातच आहे. एकूण चाचणी केलेल्या सँपल्सपैकी 31.76% रुग्णांची सँपल्स कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. चाचण्या जास्त करतो, असा दावा असणाऱ्या महाराष्ट्रात चाचण्यांची संख्याही सर्वाधिक नाही. तमिळनाडूत सर्वात जास्त चाचण्या होत आहेत. ICMR च्या नोंदीनुसार 21 जूनच्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात 7,70,711 कोविड चाचण्या झाल्या. तमिळनाडूत सर्वाधिक 7,71,263 चाचण्या झाल्या आहेत. पण रुग्ण पॉझिटिव्ह यायचं प्रमाण मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात चाचणी केलेल्या 100 रुग्णांपैकी 31.76%  लोकांचा निकाल कोरोना पॉझिटिव्ह येतो आहे. त्यामुळे दररोज कोरोनारुग्णांचं प्रणाम भयावह प्रमाणात वाढत आहे. मुंबईत दररोज किमान हजारावर नवे रुग्ण आढळून येत आहेत. 21 जूनला पुणे शहरातही कहर झाला. कोरोनाचे नवे 675 रुग्ण आढळून आले. धक्कादायक! पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात आढळले 675 रुग्ण मुंबई महानगर आणि पुणे परिसर या दोन कोरोना हॉटस्पॉटमुळे महाराष्ट्राचा कोरोना आलेख चढता आहे. Unlock नंतर कोरोनारुग्णांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्या प्रमाणात चाचण्या वाढवलेल्या नाहीत, हे वाढणाऱ्या Positivity Rate वरून लक्षात येईल. तमिळनाडूत महाराष्ट्रापेक्षा अधिक चाचण्या होऊनसुद्धा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. चाचणीचा रिझल्ट पॉझिटिव्ह यायचं प्रमाण महाराष्ट्र 31.76% दिल्ली : 22.29% तमीळनाडू : 16.29% 21 जूनपर्यंत झालेल्या चाचण्या (ICMR च्या नोंदीनुसार ) तामिळनाडू : 7,71,263 महाराष्ट्र : 7,70,711 यात दिल्लीचा क्रमांक आठवा लागतो. महाराष्ट्रात किती चाचण्या होत आहेत? 19 May: चाचण्यांची संख्या -3,04,446 03 June: चाचण्यांची संख्या - 5,05,564 13 June:  चाचण्यांची संख्या - 6,49,092 21 June: चाचण्यांची संख्या - 7,70,711 दिल्ली सरकारने COVID चाचण्यांची संख्यासुद्धा तिपटीने वाढवली आहे. आता दिल्लीच्या कुठल्याही नागरिकाला कोरोनाची चाचणी करून घ्यायला अडचण येणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी सोमवारी केला. सुरुवातीला दररोज 5000 टेस्ट केल्या जात होत्या. आता तीच संख्या दररोज 18,000 एवढी झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सरासरी 15000 चाचण्या होत असल्याचं ICMR च्या आकडेवारीनुसार दिसतं. घरीच विलगीकरणात असलेल्या Corona रुग्णांना सरकार देणार Oxymeter महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दरही देशाच्या तुलनेत खालावलेला आहे. आतापर्यंत देशात 55.80% लोकं निरोगी झाली आहेत. तर महाराष्ट्रातला Recovery Rate 49.78% आहे. मृत्यूदरदेखील गुजरातखालोखाल महाराष्ट्राचाच अधिक आहे. 4.67% रुग्ण महाराष्ट्रात दगावले आहेत. देशात कोरोनाचा (Coronavirus in India) कहर थांबता थांबत नाही आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 821 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या 4 लाख 25 हजार 282 झाली आहे. संकलन, संपादन - अरुंधती प्लाझ्मा थेरपीचं मोठं यश; आरोग्यमंत्री 24 तासांत आले ICU मधून बाहेर कोरोनाचा धोका! झोपडपट्टी नाही तर आता बहुमजली इमारतींनी वाढवली चिंता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या