महाराष्ट्रातलेच नाही तर कोरोनाचे देशातले हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात रुग्णांचा आलेख पहिल्यांदाच घसरणील लागला असून आता पुन्हा लाट येऊ नये म्हणून जास्त सावध राहण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे.
मुंबई, 8 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा (Coronavirus in Maharasthra) दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन (Maharashtra mini lockdown) जाहीर केला असला तरी राज्यातील बाधितांच्या संख्येत होणारी वाढ काही कमी होताना दिसत नाहीये. आज राज्यात 56,286 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर राज्यात आज 376 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात 5,21,317 ॲक्टिव्ह रुग्ण आज 36,130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे राज्यात आतापर्यंत एकूण 26,49,757 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.05% इतका आहे. राज्यात आज रोजी एकूण 5,21,317 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 32,29,547 झाली आहे. राज्यात आज 376 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.77% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,13,85,551 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 32,29,547 (15.10 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,02,613 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 22,661 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. हे पण वाचा: पुणे महापालिका उद्यापासूनच कडक Lockdownसाठी सज्ज, 16 दिवसांत दुप्पट बेड वाढवले राज्यातील विविध विभागांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज ठाणे मंडळात सर्वाधिक म्हणजेच 16,574 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर त्यानंतर पुणे मंडळात 13561 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यानंतर नागपूर मंडळात 8723 बाधितांची नोंद झाली आहे. पाहूयात कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद ठाणे विभागात - 16574 रुग्णांची नोंद नाशिक मंडळ - 8132 पुणे मंडळ - 13561 कोल्हापूर मंडळ - 777 औरंगाबाद मंडळ - 3010 लातूर मंडळ - 3454 अकोला मंडळ - 2055 नागपूर मंडळ - 8723 आज कुठल्या विभागात किती मृत्यू ठाणे विभागात - 79 नाशिक मंडळ - 59 पुणे मंडळ - 79 कोल्हापूर मंडळ - 14 औरंगाबाद मंडळ - 46 लातूर मंडळ - 43 अकोला मंडळ - 17 नागपूर मंडळ - 37 सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण कुठल्या जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. आजच्या तारखेला पुणे जिल्ह्यात 97242 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत 83693, ठाणे 69993, नागपूर 61711, नाशिक 34919 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याला सध्या दररोज 40 लाख डोसेसची आवश्यकता असून तशी मागणी राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा कायम आहे. लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील विविध भागांत लसीकरण ठप्प झाले आहे.