JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना उष्माघात

महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना उष्माघात

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.

जाहिरात

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 16 एप्रिल : आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. नवी मुंबईच्या मैदानामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते, पण या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं आहे. उष्माघातामुळे अनेक जण चक्कर येऊन खाली पडले आहेत, तर अनेक जणांना उलटीही झाली आहे. खारगघरमधील टाटा रुग्णालय, पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय तसंच मेडी कव्हर रुग्णालयात काही जण ऍडमिट असल्याची माहिती आहे. यातल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या अनुयायांची भेट घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. एमजीएम रुग्णालयातही काही जणांना दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमजीएम रुग्णालयात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या