JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Assembly Monsoon Session : 17 जुलैपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन

Maharashtra Assembly Monsoon Session : 17 जुलैपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन

maharashtra-assembly-monsoon-session : पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता, 17 जुलैपासून अधिवेशन सुरू होणार

जाहिरात

पावसाळी अधिवेशन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : राज्यात एकीकडे राजकीय भूकंप होत आहेत. पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेश 17 ते 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.  राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. 9 किंवा 10 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. संबंधित मंत्र्यांना त्या -त्या खात्याची माहिती असावी यासाठी आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, येत्या 9 किंवा 10 जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

Cabinet Expansion : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त ; तारीख आली समोर, अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रिपदं?

संबंधित बातम्या

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विस्तार होत असताना शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना मिळालेल्या संबधित खात्यांची माहिती असावी याअनुशंगाने आता हालचालींना वेग आलेला आहे. मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत कालच रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकिय निवास स्थानी बैठक पार पडली. उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पावर विरुद्ध पवार असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये सध्या आमदार, पदाधिकारी यांची गळती सुरू आहे. अनेक बडे नेते यामध्ये असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या